दिपक टाँकीज चौपाटी परिसरात झाड तोडत असतांना घरावर क्रेन पलटी,घराचे नुकसान मात्र जिवीत हानी नाही

241

 

वणी:- विशाल ठोबंरे

येथील जत्रा मैदान रोड दिपक टाँकीज परिसरातील काळा राम मंदीर जवळ 4 वाजताच्या दरम्यान क्रेन उलटल्याने एकच खळबळ उडाली.
विद्युत ताराच्या मधात येणारे झाड फांद्या तोडण्याचे काम महावितरणद्वारे क्रेनच्या सहाय्याने सुरु आहे.यादरम्यान क्रेन घरावर कोसळली त्यामुळे घरांचे आर्थिक नुकसान झाले.
जत्रा मैदान रोड येथे काळा राम मंदीर च्या बाजुला प्रविण रामावत यांचे घर आहे त्याच बाजूला पिंपळाचे झाड आहे. हे झाड खुब जुने आहे. ते झाड विद्युत तार शॉट सर्किट होऊ नये म्हणून तसेच ते झाड जिर्ण झाले होते त्या झाड एखाद्या घरावर पडून अपघाताची भिती निर्मान झाली होती.म्हणून नगरपरिषद कडे परवानगी मागितली होती. तो मोठा फादा तोड्णसाठी क्रेन चा वापर केला असता ती क्रेन चा बोल्यस बिघडल्या मुळे क्रेन पलटी झाली या अपघातात कोणतीही जिवंत हानी झाली नाहीं
याच परीसरातील विद्युत नवीन पोल बसविण्याचे काम सुरू करणार होते त्या साठी विद्युत सप्लाई बंद करणार होतेच या कामात काम म्हणून झाड तोडण्या साठी क्रेन बोलावण्यात आली होती दुपारी 12 ते 1च्या दरम्यान क्रेन चि मदत घेऊन झाड तोडण्याला सुरवात झाली आखरी टप्यात एक मोठा फांदा तोडल्यात आला नंतर क्रेन च्या द्वारे तो उचलण्यात आला पण फादा मोठो असल्यामुळे क्रेन चे बॅलेन्स बिघडले आणी ती क्रेन बाजुचे घर असलेल्या प्रविन रामावत यांच्या घरावर पलटी मारली यात कोणतेही जिवंत हानी झाली नाहीं पण प्रविन रामावत यांच्या घरांचे आर्थीक नुकसान झालें आहे.या परिसरातील क्रेन उलटल्याने खुप गर्दी जमली होती.