आमदार शेकाप सरचिटणीस, जयंतभाई पाटील यांनी आज अचानक व धावती भेट पुणे येथील संपर्क कार्यालयाला दिली.

140

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
शेकापचे सरचिटणीस व आमदार जयंतभाई पाटील यांनी आज पुणे शहर संपर्क कार्यालयाला अचानक व धावती भेट देऊन कार्याचा आढावा घेतला. व पुढील कामासाठी मार्गदर्शन देखील केले. यावेळी संघटना वाढवण्यासाठी व मजबूत करण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले व कोरोनाच्या पाश्वभूमीवर जनसामान्यांना मदत करण्याचे आवाहन देखील केले. यावेळी शेकाप पुणे पदाधिकारी पुणे शहर अध्यक्ष सागर आल्हाट, सिद्धार्थ कार्लेकर, सागर पवार,महेश वनशिव, धनंजय सुतकर, शरद देशमुख,योगेश कांबळे,अक्षय केदारी,खालीद सय्यद, काशीनाथ शिंदे,विजय आगवणे,सचिन‌ गाडे आदी उपस्थित होते.