गोंदियात ‘कर्फ्यू‘ला जनतेचा प्रतिसाद

110

 

बिंबिसार शहारे/राहुल उके

गोंदिया,
कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने शनिवारी (दि.८) व रविवारी (दि. ९) शहरात जनता कफ्र्यूचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला साद देत शहरवासींनी उत्स्ङ्कूर्त प्रतिसाद दिला. शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, लहान-मोठी दुकाने कडकडीत बंद होती.त्यातच आज पुन्हा 37 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून सर्वाधिक तिरोडा तालुक्यातील आहेत.
गोंदिया जिल्ह्यात कोरोना क्रियाशील रुग्णांच्या संख्येने द्विशतक पूर्ण केले आहे. दररोज कुठे ना कुठे बाधित रुग्ण आढळून येत आहेत. ही प्रशासन आणि नागरिकांची qचता वाढविणारी बाब आहे. अनलॉक सुरू झाल्यापासून रुग्णसंख्या वाढत असल्याचे बोलले जाते. गोंदिया शहरातदेखील मागील काही दिवसांपासून सातत्याने कोरोना विषाणूचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आगामी काळात नगर परिषद क्षेत्रात कोरोना विषाणूचा समूह संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संक्रमण रोखण्यासाठी शनिवारी व रविवारी जनता कफ्र्यू लावण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. तसे आवाहनदेखील करण्यात आले. या आवाहनाला साद देत शहरवासींनी आज, शनिवारी पहिल्याच दिवशी उत्स्ङ्कूर्त प्रतिसाद दिला. व्यापाèयांनी आपापली व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली होती. लहान-मोठी सर्व दुकाने बंद होती. अत्यावश्यक सेवा मात्र यावेळी सुरू ठेवण्यात आल्या होत्या. चौकाचौकात पोलिस तैनात होते. शनिवारप्रमाणेच रविवारीदेखील जनतेने कफ्र्यूला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले.