टाकळी बु.परिसरात शेकडो एकरावरील मुगावर अज्ञात रोगाचे आक्रमण उत्पादन घटण्याची शक्यता शेतकय्रांनी वखरला मुग

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

आकोट तालुक्यातील टाकळी बु.परिसरातील शेकडो एकरावरील मुग पिकावर अज्ञात रोगाने आक्रमण झाले आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अज्ञात रोगामुळे मुग पिकाच्या पाने शेगांवर कोकडा आल्याचे दिसुन येत आहे त्यामुळे मुगाचे उत्पन्न घटण्याची शक्यता आहे. तसेच लागवडीसाठी शेतकय्रांनी केलेला खर्चदेखील भरून काढणार नाही,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे शेतकय्रांना दिलासा देण्यासाठी पीक विम्याच्या माध्यमातुन नुकसान भरपाई देण्याची मागणी या परिसरातील शेतकरी करीत आहेत. शेतकय्रांना अत्यंत कमी दिवसात आणि ज्यावेळी शेतकय्रांना शेतीच्या मशागतीसाठी पैशांची चणचण भासते अशा वेळी मदतीचा हात देणारे पीक म्हणुन मुगाची ओळख आहे. मुग पिकावर पाने अकडणाय्रा अज्ञात रोगाचे आक्रमण झाले ,असल्याने मोठया प्रमाणात फुलाची गळती होत आहे यासोबतच ज्या मुगाला शेंगा पकडलेल्या आहेत त्या शेंगादेखील अकडत आहेत. अकडलेल्या शेंगामध्ये पुर्णपणे दाणे भरत नसल्यामुळे शेतकय्रांनी बियाणे खरेदी व पेरणी तसेच पेरणीनंतर फवारणी व खते आणी इतर मशागतीसाठी केलेला खर्चदेखील भरून निघणार नाही अशी परिस्थिती आहे.काही शेतकय्रांनी मुगाच्या पिकावर नांगर फिरविला आहे संकटग्रस्त शेतकय्रांना शासनाने पीक विम्याच्या माध्यमातुन मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे. शेतीचे पंचनामे करून तातडीने मदत करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.

चौकट

२२ जूनला मुगाची पेरणी केली पावसाने दडी मारल्यावर तलावातील पाणी पिकाला दिले वेळेवर फवारणी केली आता अज्ञात रोगाने मुगावर आक्रमण केले आहे.अज्ञात रोगामुळे मुगाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे कुषी विभागाने तातडीने उपाययोजना करावी.

रामकृष्ण वसु शेतकरी टाकळी बु.

चौकट

सद्ध्या मुग पिकावर बीन लिफ क्रिनकल व्हायरस चा प्रादुर्भाव सर्वदूर झालेला आहे. या व्हायरस चा प्रसार पांढरी माशी ने होतो उडीद पिकावर सुद्धा हा प्रादुर्भाव येण्याची शक्यता आहे. तरी प्रादुर्भाव दिसताच रोगग्रस्त पीक काढून त्याचा नायनाट करावा व पांढरी माशी च्या व्यवस्थापना करिता मीथील डेमीटन 25 टक्के प्रवाही 500 मीली प्रति हेक्टरी किंवा डायमीथोऍट 30 टक्के प्रवाही 500 मीली प्रति हेक्टरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

सुशांत शिंदे तालुका कृषी अधिकारी आकोट