टीईटी चा निकाल लागला मात्र शिक्षक भरती केव्हा करणार. 2010 पासून शिक्षक भरती ला ब्रेक

193

राजेंद्र न्हावी जळगाव जिल्हा प्रतिनिधी दखल न्युज भारत
जळगाव शिक्षक पात्रता टीईटीचा निकाल दोन दिवसापूर्वी लागला असून त्यात 16500 भावी शिक्षक पात्र झाले, तर अडीच लाख भावि शिक्षक नापास झाले. दुसरीकडे राज्यात सुमारे 20 हजार 661 शिक्षक पदे रिक्त आहेत त्यामुळे काही शाळांमध्ये एकाच शिक्षकाला चार वर्गाचा भार उचलावा लागत आहे. बेरोजगार की पास झालेले व नियमित शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांनाही न्याय मिळेल याबाबत शासनाने महत्त्वाचे निर्णय घ्यावेत असे मत पात्र शिक्षकांकडून व्यक्त केले जात आहेत.
राज्यातील खाजगी अनुदानित व जिल्हा परिषद शाळेमध्ये 2018 पासून 20 हजार 661 पदे रिक्त आहेत 120 शाळांना अद्यापही पूर्णवेळ शिक्षक नाही रिक्त पदांची संख्या वाढतच आहे पदे रिक्त असल्याने प्रत्येक शिक्षकाला अधिक चे वर्ग सांभाळावे लागत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे