एकता फाउंडेशन नागपुर,महाराष्ट्र, भारत तर्फे दखल न्युज भारत चे संचालक व संपादक आ.जगदीशजी वेन्नम सर यांचं कोव्हिड योद्धा गौरव पुरस्कार….

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम : संपुर्ण जग कोव्हिड -19 च्या संसर्गजन्य रोगाने हादरून गेलेला आहे.अश्या संसर्गजन्य कोरोना संकटात स्व:ताच्या जीवाचा पर्वा न करता पत्रकारिता व सामाजिक कार्य तसेच आरोग्य,स्वच्छता कार्यात उल्लेखनीय कार्य केलेत.पोलिस मित्र पारिवारिक संघटना, पोलिस बाईज असोसिएशन ,श्री गुरुदेव सेना जय जवान जय किसान या संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून गडचिरोली जिल्ह्यात उत्तम रित्या कार्य केले आहेत.
त्यांची कार्याची एकता फाऊंडेशन नागपुर ,महाराष्ट्र, भारत ने दखल घेऊन त्यांना कोव्हीड योद्धा म्हणून सम्मान पत्र देऊन गौरविण्यात आले आहे. आ.जगदीशजी वेन्नम सर यांची सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.