वारजे परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवणार आमदार भिमराव तापकीरांची ग्वाही.

52

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
वारजे परिसरातील प्रभाग क्रमांक ३२ मधल्या जुब्ली पार्क सोसायटीमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्या समस्यांमुळे तिथले रहिवासी त्रस्त झाले होते.यासंदर्भात वासुदेव भोसलेंनी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर व नागरिकांची बैठक लावली होती. या बैठकीत नागरिकांनी आपल्या समस्या आमदारांसमोर मांडल्या व आमदारांनी देखील त्या शांतपणे ऐकून घेतल्या, व त्या समस्या संबंधित लोकांशी बोलून सोडवून देऊ, अशी ग्वाही आमदारांनी नागरिकांना दिली. तसेच यावेळी वासुदेव भोसले यांनी सोसायटी करता लहान मोठे कचर्याचे डबे उपलब्ध करून दिले ते आमदार भिमराव तापकीरांच्या हस्ते दिले. यावेळी भाजपा उपाध्यक्ष माधव देशपांडे, निलेश शिरखेडकर, विवेक बेहेरे, विजय डेकाटे, अरूण अनासपुरे, योगेश देशमुख, अमोल माने, सचिन शिंदे तसेच सोसायटीतील भिंताडे काका, मनोज बरडे, सारंग पंडित, अनिल पवार, राहुल नरवडे, कुलकर्णी काका सोबतच पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.