उत्तमनगरमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीसमोर आंदोलन.

71

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
दि 24 सप्टेंबर 2021रोजी पुणे महानगरपालिका मुख्य इमारती समोर उत्तमनगर येथे मुख्य रस्त्याला सार्वजनिक शौचालय व्हावे याकरिता राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक अध्यक्ष उमेश कोकरे यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली,व गाव पुढाऱ्यांनी स्वतःचा खिसा भरण्याकरिता शौचालय पाडल्याने भाजीवाले ,फेरीवाले ,बाजारपेठत खरेदीसाठी येणाऱ्या महिला व नागरिकांची शारीरिक कुचंबना थांबावी व लवकरात लवकर सार्वजनिक शौचालय व्हावे अशी भूमिका उमेश कोकरे यांनी मांडली.स्थानिक पुढारी फक्त स्वतःचा विकास साध्य करण्यासाठी पुढे पुढे दिसतात, उमेश कोकरे नेहमी लोकहिताच्या कामासाठी सदैव तत्पर असतात.