महाराष्ट्र राज्याचे राज्य मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे मामा यांच्या हस्ते पिंपरी बुद्रुक येथे नव्याने सुरू होत असलेले प्राजक्ता इंजीनियरिंग व इलेक्ट्रिकल उद्योग समूहाचे उद्घाटन करण्यात आले.  तरुणांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वतःचा व्यवसाय करणे गरजेचे उद्घाटन प्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे मामा बोलत होते:-

 

नीरा नरसिंहपुर दिनांक 8 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,

पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे कल्याण भंडलकर यांच्या कुटुंबाच्या वतीने प्राजक्ता इंजीनियरिंग व इलेक्ट्रिकल हा उद्योग समूह  सुरू करण्यात आलेला असून या नव्याने पिंपरी बुद्रुक येथे होत आहे  या उद्योग समूहाचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे मामा यांच्या हस्ते संपन्न झाले.  राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे उद्घाटन प्रसंगी म्हणाले की मला भंडलकर कुटुंबांनी बोलवले म्हणून त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो हा व्यवसाय नवीन तरुणांना प्रेरणादायी मिळेल तरुणांनी नवीन-नवीन वेगळा हा व्यवसाय केला पाहिजे व्यवसाय जुनाच परंतु नवीन व्यवसायाला चांगली प्रेरणा दिली नोकरीच्या मागे न लागता  तरुणाने स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे मामा उद्घाटन प्रसंगी बोलत होते तोच उद्योग समूह पिंपरी बुद्रुक मध्ये होत असल्याचे आनंद व्यक्त केले. या उद्घाटन प्रसंगी पिंपरी बुद्रुक मधील भंडलकर कुटुंब व ग्रामस्थ, कल्याण भंडलकर, बबन दादा बोडके मा. सरपंच सोमनाथ माहिते दत्तूनाना बोडके संतोष सुतार बाळासाहेब घाडगे, समाधान बोडके, हनुमंत पडळकर नागेश गायकवाड, नाता रुपनवर, कैलास बंडगर, शरद बोडके, बालाजी बोडके,  महेश सुतार, जगुमामा मोहिते,  भागवत भंडलकर, निवृत्ती भंडलकर, आप्पा भंडलकर,या सर्वांच्या उपस्थित राहून पिंपरी बुद्रुक येथे नवीन होणार्‍या उद्योग समूहाचे उद्घाटन  राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाले.

————————————————–फोटो:-ओळी- पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे प्राजक्ता इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल समूहाचे उद्घाटन करीत असताना महाराष्ट्राचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे मामा व उपस्थित ग्रामस्थ.

 

 

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160