24 तासात 82 नवे रुग्ण.एकूण 2148

 

प्रतिनिधी / गौरव मुळ्ये.

रत्नागिरी- गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 82 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2148 झाली आहे. दरम्यान 33 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1479 झाली आहे.
पॉझिटिव्ह रुग्ण रत्नागिरी – 32, कामथे – 17, कळबणी – 16, लांजा – 5, गुहागर – 7, देवरुख – 1, ॲन्टीजेन टेस्ट – 4
घारेवाडी, चिपळूण येथील 58 वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यु झाला आहे. तसेच 25 जुलै 2020 रोजी मृत्यु झालेल्या एका कोरोना रुग्णाचा अहवाल उशीरा प्राप्त झाल्याने त्याची नोंद आज घेण्यात आल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता 73 झाली आहे. 1479 रुग्ण बरे झाले आहेत बरे होण्याचे प्रमाण 68.8 टक्के.

दखल न्यूज भारत