दुकानदार महिलेचा विनयभंग करणाऱ्या युवकाला अटक कोरची येथील घटना

388

 

हर्ष साखरे उपसंपादक

कोरची : एका दुकानदार विधवा महिलेच्या दुकानात शिरून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी जितेंद्र सुदाराम सहारे ( ३८ ) या युवकाला अटक केली . त्याला न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला . आरोपी हा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती या संघटनेचा जिल्हा संघटक म्हणून वावरत होता . याशिवाय तो एका न्यूज पोर्टलचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले जाते . पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार , आरोपी सहारे याने कोरचीतील एका ३६ वर्षीय महिलेच्या दुकानातभरदिवसा शिरून ‘ तू माझ्यासोबत का बोलत नाहीस , मला का भेटत नाहीस ‘ असे म्हणून हात पकडून तिला मारहाण करत तिचा विनयभंग केला . यामुळे पीडित महिलेने दि . २१ ला कोरची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली . त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटककेली . त्याच्यावर भादंवि कलम ३५४ , ३५४ ड , ४४८ , ५० ९ , ३२३ , ५०६ नुसार गुन्हा दाखल केला . बुधवारी कोरची पोलिसांनी आरोपीला कुरखेडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांचा एमसीआर दिला .