आरमोरी वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले बुलबुल पक्षास जीवनदान. – संस्थेचे पदाधिकारी देवानंद दुमाने आणि अमोल मारकवार यांचे अभिनंदन. – वृक्षवल्ली वन्यजीव संस्था वन्यजीवांना जीवनदान देत असतात. – नागरिकांनी वन्यजीवास जीवनदान द्यावे संस्थेचे आव्हान.

40

 

प्रतिनिधी//प्रलय सहारे

वैरागड : – वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षक संस्था आरमोरी साप तसेच वन्यजीव प्राण्यांना जीवनदान देण्याचे कार्य करीत असतात याच माध्यमातून संस्थेच्या पदाधिकारी यांनी दि. 22 सप्टेंबर रोजी बुलबुल पक्ष्यास जीवनदान दिल्याची घटना झाली.

आरमोरी वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षक ससंस्थेचे अध्यक्ष देवानंद दुमाने आणि कर्याध्यक्ष अमोल मारकवार काही कामा निमित्य वाडसा वरून परत आरमोरी येथे येत असताना वडसा रोड वरील आरमोरी नगर परिषद जवळील कचरा कुंडी लगत संध्याकाळी बुलबुल पक्षी तळफळत आणि मरण अवस्थेत दिसला असता संस्थेचे पदाधिकारी देवानंद दुमाने तसेच अमोल मारकवार यांनीं तत्काळ बुलबुल पक्षास पाणी पाजून त्याला त्याच्या निसर्गजन्य निवासस्थानात सोडून दिले.

त्यांच्या या कार्या बद्दल परिसरात आनंद व्यक्त करून व्यन्यजीव रक्षणासाठी अभिनंदन करीत आहेत. प्रत्येक नागरिकांनी वन्यजीव प्राण्यांवर प्रेम करून त्यांना जीवनदान द्यावे असे आव्हान वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षक संस्था आरमोरी यांनी केले आहे.