धारगड समितीच्या भाविकांना पालकमंत्री बच्चू कडू यांचा दिलासा!

472

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

दरवर्षी श्रावण महीन्याच्या तिसर्या सोमवारी चिखलदरा वनपरीक्षेत्राच्या हद्दीत असलेल्या धारगड या धार्मीक स्थळावर ४ जिल्ह्यातील कावडधारी व भावीकांचीची मोठ्या प्रमाणात दर्शन व पुजेकरीता गर्दी होत असते. परंतू या वर्षी संपुर्ण जगावर कोरोणाचे संकट असून त्याच पार्श्वभुमीवर कुठेही गर्दी करण्यास सक्त मनाईचे शासनाचे आदेश आहेत.
परंतू धारगड यात्रेची गेल्या ७० वर्षाची अखंडीत परपंरा असून या यात्रेत खंड पडू नये व सोबतच भोलेभक्तांच्या भावनांचा आदर करीत अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी धारगड समितीचे १३ सभासद अधिक १ पुजारी यांना समस्त कावडधारी व भोलेभक्तातर्फे प्रातिनिधीक स्वरुपात धारगडला जाऊन प्रत्यक्ष पुजाअर्चा करायची परवानगी दिली आहे. सोबतच पालकमंत्री बच्चू कडू यांनी समस्त भोलेभक्तांना, कावडधारींना कोरोणाच्या पार्श्वभुमीमुळं यंदा घरी राहूनच उपासना व पुजा करायची विनंती केली आहे. सोबतच सर्वांना श्रावनाच्या शुभकामना ही दिल्या आहेत.
हि परवानगी मिळावी करीता पालकमंत्री बच्चू कडू श्रिनिवासन रेड्डी साहेब सिसिएफ अमरावती विभाग, अमरावती जिल्हाधीकारी साहेब, अकोला जिल्हाधीकारी साहेब तसेच चिखलदरा तहसीलदार साहेब यांचेशी सतत संपर्कात होते.
तसेच बच्चू कडू यांचे खाजगी चिटनिस दिपक भोंगाळे, संजय कडू व धारगड समितीचे अध्यक्ष सुरेशसेठ अग्रवाल, धारगड समितीचे सदस्य व शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनी हि परवानगी मिळवन्याकरीता अथक परिश्रम घेतले.