विद्युत पुरवठा खंडित करण्यापूर्वी नोटीस ग्राहकांना देण्या: बादल उराडे

74

 

दख़ल न्यूज़ भारत:शंकर महाकाली
तालुका प्रतिनिधि, बल्लारपुर

बल्लारपुर: कोव्हिड-१९ कोरोना या महामारीचा आजाराच्या काळामध्ये संपूर्ण भारत बंद असल्यामुळे गरीब जनतेची आर्थिक पिळवणूक झालेली आहे. आज ही कोणतेही सुधारणा झालेली नाही, आजच्या काळात जनतेची नाही तर विद्युत विभागाची सुद्धा आर्थिक परिस्थिती फार हल्लाकीची आहे.आज सुध्दा कोरोना या आजारामुळे फार दहशतीचे वातावरण आहे. बरेच लोक बेरोजगार झालेले आहे, अशा परिस्थितीत बरेच लोक विद्युत बिल भरलेली नाही. त्या थकबाकीदरांचे त्यांना कोणतेही सूचना न देता विद्युत विभागाचे कर्मचारी मार्फत ग्राहकांचे विद्युत कनेक्शन येत. तसेच ग्राहकांना विद्युत विभागाच्या कर्मचारी लोकांपासून उदट वागणूक देण्यात येत आहे.

विद्युत बिल थकबाकी असलेली ग्राहकांना त्यांचे विद्युत पुरवठा खंडित करण्यापूर्वी लेखी नोटीस ग्राहकांना देण्या यावे या करिता बल्लारपूर राष्ट्रवादी काँग्रेस तालूका व शहर यांच्या तर्फे म.रा.वि.म.वितरण विभाग बल्लारपूर येथे निवेदन देण्यात आले. यात उपस्थित बल्लारपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष महादेव देवतळे ,शहर अध्यक्ष बादल उराडे, कार्याध्यक्ष राकेश सोमानी,उपाध्यक्ष आरिफ खान ,महिला शहर अध्यक्ष अर्चनाताई बुटले, कार्यकारी अध्यक्ष सयजादि अन्सारी, महासचिव शुभांगी साठे,महासचिव संजय अग्रवाल,सुमित(गोलू)डोहणे, अंकीत निवलकर,जितेश पिल्ले, निजाम भाई, नितीन सोयाम, रवी बेज्जला, इब्राहिम खान, शाबीर भाई, राजू काब्रा,व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.