भोर रिंग रोड विरोधी कृती समितीच्या वतीने नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेना निवेदन.

64

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे जिल्हातून जाणारा रिंग रोड हा शेतकर्यांचा विकास नसून तर अधोगती आहे.ह्याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधींचे लक्ष नव्हते, परंतु आता ह्याकडे सगळेजण लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. कारण ग्रामीण भाग आता ह्या रिंग रोडमुळे भूमिहीन होत आहे. ह्याची दखल भोर रिंग रोड विरोधी कृती समिती व जिल्हाप्रमुख रमेश बाप्पु कोंडे तसेच जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे व आमदार संग्राम थोपटे तसेच समितीचे सदस्य तसेच या भागातील बाधित शेतकर्यांनी राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली बाजू निवेदनाद्वारे मांडली. मंत्री एकनाथ शिंदेनी देखील शेतकरी व अधिकारी यांची बैठक लावून त्यांच्या व्यथा समजून घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याचे तातडीने आदेश दिले.