मावळा जवान संघटना आयोजित शिवजन्मोत्सोवानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.

80

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
मावळा जवान संघटना आयोजित शिवजन्मोत्सोवानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम खानापुर येथिल मातोश्री गार्डन येथे मा. जिल्हा परिषद सदस्य नवनाथदादा पारगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. एकूण तीन गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यभरातील एकूण १६० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, त्यामध्ये तीन्ही गटात नंबर विभागून देण्यात आले.लहान गटात प्रथम आरोही सोन्ने उस्मानाबाद, मोठ्या गटात प्रथम श्रावणी बेलुसे, खुल्या गटात प्रथम ओंकार यादव खानापुर सर्व स्पर्धकांना नाथ प्रतिष्ठानच्या वतीने कै.एकनाथ दारवटकर यांच्या स्मरणार्थ प्रमाणपत्र, रोख रक्कम, ट्रॉफी, पुस्तके आणि गुलाब गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास मा.नवनाथ पारगे यांच्यासह इतिहास संशोधक मा.दत्ताजी नलावडे, अनिताताई इंगळे जि. प. सदस्य, मा. सभापती पंचायत समिती प्रभावती भुमकर, प्रवीन शिंदे रेल्वे सदस्य, मोहन दुधाने रेल्वे अधिकारी,मा. सरपंच खानापूर शरद जावळकर, उपसरपंच खामगाव मावळ प्रशांत दारवटकर या मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.शिंदे सर, जोरी सर, चव्हाण सर, जाधव सर आणि रेश्मा यादव यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले होते, हे देखील यावेळी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे नियोजन रोहित नलावडे, प्रशांत भोसले, शांताराम लांगे, श्रीकांत दारवटकर, मेघा दारवटकर, विनोद थोपटे यांनी केले होते.शिवभक्त लक्ष्मण दारवटकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुष तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतात, कार्यक्रमाला राज्यभरातुन शिक्षकवृंद, पालकवर्ग, पत्रकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.