आर्वी गावचे सुपुत्र सौरभ घोगरे यांची भारतीय सैन्य दलात निवड पुणे जिल्हा शिवसेनेकडून सत्कार.

112

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
हवेली तालुक्यातील आर्वी गावचे सुपुत्र सौरभ घोगरे यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे. खुप कष्ट करून अथक परिश्रम घेतल्याने ह्या शेतकरी पुत्राची निवड झाली आहे. त्याच्या निवडीमुळे संपूर्ण गावाला त्याचा अभिमान वाटत आहे. याची दखल घेऊन शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख रमेश बाप्पु कोंडे तसेच ग्रामस्थांनी त्याचा सत्कार करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.भारतीय सैन्याचा इतिहास आहे तिथे फक्त ग्रामीण भागातील तरूण व शेतकर्याचाच मुलगा प्रामाणिक काम करतो व देशसेवेसाठी नेहमी पुढे येत असतो.