शेतकऱ्यांनी जाणून घेतले विद्यार्थ्याकडून गांडूळ खताचे महत्त्व

160

 

वणी : परशुराम पोटे

मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थी संकेत डवरे यांचा तालुक्यातील निवली येथे अभिनव उपक्रम.
रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते मात्र भौतिक सुपिकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. गांडुळाच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागतकेली जाते. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
जमिनीची धूप कमी होते. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
जमिनीचा सामू (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो.
गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात. गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामूळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात.जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत भरमसाठ वाढ होते. ओला कचरा व्यावास्तापन पण होते मातीचा कस टिकून राहतो या खतामुळे मातीमधील सूक्ष्मजीव टिकून राहतात. असे विद्यार्थ्यांनी निवली येथिल शेतकऱ्यांना सांगितले.
सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.ए.ठाकरे उपप्राचार्य एम.व्ही.कडू व प्राध्यापिका पि.आर.चौरे यांचे मार्गदर्शन लाभले
तसेच गावातील अनील मोहीतकर ,दशरथ निंदेकर, राजू मोहितकर ,सचिन मोहितकर,जतीन मोहितकर उपस्थीत होते.