अत्याचार पिडीत तरूणीने अत्याचार सहन न झाल्याने विहीरीत उडी घेऊन केली आत्महत्या.

0
501

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत पोपटे,
नागपूर विभागीय प्रतिनिधी,
दखल न्युज व दखल न्युज भारत.

१६ वर्षीय तरुणीवर दोन नराधमांनी केलेल्या अत्याचाराने स्वत:ची व कुटुंबाचे बदनामीपोटी विहीरीत उडी घेऊन आपले जिवन संपविले.
सविस्तर वृत्त असे की, नागभिड तालुक्यातील कसर्ला (पेंढरी) येथील वाघमारे कुटुंबातील १६ वर्षीय मुलगी आईचे सांगण्यावरून आपले शेतावर गेली असता तेथीलच दोन वासनांध तरूण १) अरूण न्नावरे वय २२वर्षे २) मंगेश मगरे वय २७ वर्षे यांनी ती शेतावर एकटीच असल्याचा फायदा घेत, दोघांनीही तिचेवर जबरदस्तीने आळीपाळीने अत्याचार केला. त्या नराधमांनी तिचेवर केलेला अत्त्याचार सहन झाल्याने ती घरी येऊन आत्महत्त्या करीत असल्याचे कारण चिठ्ठीत लिहून ठेवले. व शेतातील विहीरीत उडी घेऊन आतमहत्त्या केली. सायंकाळी मुलीची आई कामावरून घरी आली असता, मुलगी घरी दिसून न आल्याने आजुबाजुला मुलीबद्दल विचारले असता, कुणाकडेही आढळून न आल्याने दि. ७/८/२०२० चे रात्री ८-०० वाजता नागभिड पोलीस स्टेशन गाठले. व मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार केली. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील नातेवाईक यांनी शोधाशोध केली असता, शेतातील विहीरीचे बाजूला मुलीने लिहून ठेवलेला कागद आढळून आल्याने नातेवाईक यांची शंका बळावल्याने विहीरीत गळ टाकून पाहिले असता, मुलीचे प्रेत गळाला लटकून आले असल्याने भ्रमणध्वनीवर नागभीड पोलीस स्टेशनला माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार अप्पर पोलीस अधीक्षक- प्रशांत खैरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक- अनुप तारे, नागभीड पोलिस निरीक्षक दिपक गोतमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुनम पाटील आणि वैभव कोरवते हे ठिकाणावर पोचले. व मुलीचे प्रेत विहीरीतून बाहेर काढून, प्रेताचा पंचनामा करून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य
रुग्णालय व मेडिकल कॉलेज चंद्रपूर येथे पाठविण्यात आले असून सदर आरोपींना ताब्यात घेऊन, अप. क्र. २२७/ २०२० नुसार कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर परत कलम अॅड केल्या जातील, असे पोलिस निरीक्षक दिपक गोतमारे यांनी प्रतिनिधी यांना भ्रमणध्वनीवर सांगितले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दिपक गोतमारे यांचे मार्गदर्शनाखाली डब्लु. ए. पी. आय. पुनम पाटील ह्या करीत असल्याचे पोलीस सुत्रांनुसार कळले.