वाढत्या रुग्ण संख्येत आणखी ५८ नव्या रुग्णांची भर बाधितांची संख्या ५५१ वर २२३ क्रियाशील रुग्ण कोरोनामुक्त रुग्ण संख्या २९८ तहसीलदार व नगरपरिषद प्रशासक भोयर नी केला कन्टेन्टमेन चा दौरा..

0
160

 

सचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत..।।
गोंदिया दि.०८ कोरोना या जागतिक महामारीमुळे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात कोरोना बाधित रुग्णांचा आलेख सातत्याने वाढत आहे.आज ८ ऑगस्ट जिल्ह्यातील ५८ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाल्याचा अहवाल गोंदियाच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त झाला आहे.४१ रुग्ण कोरोनातुन बरे झाल्याने आज त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

आज कोरोना बाधित आढळलेल्या ५८ रुग्णांमुळे जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या ५५१ झाली आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे क्रियाशील रुग्ण संख्या देखील वाढत आहे.ही रुग्ण संख्या आता २२३ वर पोहचली आहे.

कोरोनाची बाधा झालेले जे ५८ रुग्ण जिल्ह्यात आढळून आहे त्यामध्ये गोंदिया तालुक्यातील २४ रुग्ण असून यामध्ये दवनीवाडा,भानपूर व कुडवा येथील प्रत्येकी एक रुग्ण,गोंदिया शहरातील रेलटोली भागातील १४ रुग्ण, गोंदिया शहरात पाहुणा म्हणून आलेला एक रुग्ण, शास्त्री वार्डातील चार रुग्ण, सिव्हिल लाईन येथील एक रुग्ण,एक रुग्ण हा नागपूर येथून आलेला आहे. तिरोडा तालुक्यातील २५ रुग्ण असून यामध्ये बेलाटी/खुर्द येथील नऊ रुग्ण आणि अदानी प्रकल्पातील सोळा कामगार आहे. आमगाव तालुक्यातील चिरचाळबांध, पदमपुर, बनगाव व डोंगरगाव येथील प्रत्येकी रुग्ण,गोरेगाव तालुक्यातील गवरीटोला येथील एक रुग्ण,सालेकसा तालुक्यातील तेढा येथील एक रुग्ण, आणि अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील एक रुग्ण आणि सडक/अर्जुनी तालुक्यातील खोडशिवणी व सौंदड येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

कोरोनावर मात करून जे ४१ रुग्ण बरे झाले त्यांना आज सुट्टी देण्यात आली.यामध्ये गोंदिया तालुक्यातील १५,तिरोडा तालुक्यातील १६, अर्जुनी/मोर तालुका एक रुग्ण, सालेकसा तालुका एक रुग्ण,देवरी तालुक्यातील आठ रुग्णांचा समावेश आहे.आतापर्यंत २९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण १०८४४ नमुने पाठविण्यात आले. यामध्ये १००९७ नमुने निगेटिव्ह आढळून आले .४८७ नमुने पॉझिटिव्ह आढळले आहे.११५ नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित आहे.तर १४३ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे.

जिल्ह्याचे चार बाधित रुग्ण हे जिल्ह्याबाहेर बाधित आढळले आहे.गोंदियाच्या प्रयोगशाळेतून ४८७ आणि रॅपिड अँटिजेन टेस्टमधून ६० असे एकूण ५५१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.

विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात २०६ व्यक्ती आणि गृह विलगिकरणात ९५२ व्यक्ती अशा एकूण ११५८ व्यक्ती विलगिकरणात असून या सर्व प्रशासनाच्या देखरेखीखाली आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांची तपासणी करून उपचार करीत आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा तात्काळ शोध रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. जिल्ह्यात ४११५ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले.यामध्ये ४०५५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.६० व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १७६ चमू आणि ८३ सुपरवायझर ७० कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे.ज्या गावात आणि आणि नगर पालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे तो भाग कंटेंटमेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे.

क्रियाशील कॅटेंटमेंट क्षेत्र जिल्ह्यात ७० आहे.यामध्ये गोंदिया तालुक्यात चांदणीटोला,कुडवा,गोंदिया येथील यादव चौक,सिव्हिल लाईन, रेल्वे लाईन,श्रीनगर, शास्त्री वार्ड,संगम बिल्डींग गल्ली व सिंधी कॉलोनी. सालेकसा तालुक्यातील भजेपार, पाउलदौना,रामाटोला व तितेपार. देवरी तालुकयातील आखरीटोला भागी,परसटोला,गरवारटोली व नवाटोला, देवरी शहरातील वार्ड क्रमांक ५,८,९,१०.सडक/अर्जुनी तालुक्यातील हलबीटोला,डव्वा, काटेकुर्रा.गोरेगाव तालुक्यातील घोटी व पिंडकेपार.

तिरोडा तालुक्यातील वडेगाव,मुंडीकोटा,सतोना,लाखेगाव,माली,लोणार,खैरबोडी,गुमाधावडा,वडेगाव-२,गोंडमोहाडी,पाटीलटोला, इसापूर,सेजगाव,पालडोंगरी,पिपरिया,उमरी,पांजरा, घोघरा,सरांडी,घोघरा-२,
मलपूरी,वडेगाव -२,मुंडीकोटा रेल्वे स्टेशन, बयाबाब(मुंडीकोटा),तिरोडा शहरातील न्यू सुभाष वार्ड,किल्ला वार्ड, नेहरू वार्ड,गुरुदेव वार्ड,महात्मा गांधी वार्ड,,रवींद्र वार्ड,लक्ष्मी वार्ड , महात्मा फुले वार्ड व लक्ष्मीनगर बेलाटी/खुर्दचा समावेश आहे.

अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी, सिंगलटोली, ताडगाव व वडेगाव,खाडीपार, रेंगेपार, पोहाडीटोला आणि आमगाव तालुक्यातील तिगाव आणि चिरचाळबांध आदी गावे आणि वार्ड कंटेनमेंट क्षेत्रामध्ये आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भूषणकुमार रामटेके यांनी दिली.

*काळजी घ्या*
*अंतर ठेवा*
*मास्क बांधा*
*सुरक्षित राहा*