Home चंद्रपूर  करोडोंचा महसुल बुडविणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाही करण्यासाठी – अविनाश  वारजूरकर (माजी अध्यक्ष खनिकर्म...

करोडोंचा महसुल बुडविणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाही करण्यासाठी – अविनाश  वारजूरकर (माजी अध्यक्ष खनिकर्म महामंडळ तथा माजी आमदार चिमूर विधान सभा ) यांनी दिले निवेदन

361

 

प्रतिनिधी/शुभम पारखी
7218216140
8552850228

गौन खनिज वाहतुकिच्या माध्यामातुन शासनास दररोज करोडो रूपयांचा महसुल मिळतो मात्र नागपुर विभागातील काही अधिकारी संगनमताने शासनाचा हा महसुल बुडबुन मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार करतात. असाच काहीसा प्रकार नागपुर विभागात येथे गेल्या काही महिण्यापासुन सुरू आहे. नागपुर विभागात विनापरवाना गोन खनिज व रेतीची वाहतुक मोठया प्रमाणावर सुरू आहे. त्याद्वारे महाराष्ट्र शासनाचा मोठया प्रमाणात महसुल बुडत आहे. नागपुरचे शहरचे आरटीओ श्री मनबर व नागपुर ग्रामिणचे आरटीओ श्री. बजरंग खरमाटे यांच्या आशीर्वादाने व सहकार्याने हा सर्व प्रकार दिवसाढवळ्या सुरू आहे. या अवैध वाहतुकिवर भरारी पथका कडुन कोणत्याही प्रकाराची कार्यवाही न करता प्रत्येक ट्रक कडुन दरमहा आठ हजार रूपयांची अवैध वसुली केली जात आहे. नागपुर विभागातील गोंदीया, भंडारा, गडचिरोली चंदपुर वर्धा अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून ६००० च्या वर वाहनांकडुन गौण खनिज व रेतीची वाहतुक सुरु आहे ट्रक मालक चालक व आरटीओचे अधिकारी यांच्या संगनमताने हा सर्व व्यवहार अहोरात्र सुरू आहे.या सर्व व्यवाहारांमध्ये बिटु तिवारी नामक व्यक्तीक सहभागी असुन तो या ट्रक मालकांकडुन दरमहा प्रती ट्रक आठ हजार रूपयांची अवैध वसुली करीत आहे. हे सर्व नागपुर ग्रामीणचे भ्रष्ट अधिकारी श्री. बजरंग खरमाटे यांच्यामुळे सुरू आहे. माझी वरपर्यंत पोहोच आहे व माझे कोणी काही बिघडु शकत नाही असे सांगुन जबरदस्तीने हि वसुली सुरु आहे. जे ट्रक मालक पैसे देत नाही फक्त अशांच्याच गाड्या पकडून त्यांना चालान करण्यात येते व त्यांच्याकडुन
मोठया प्रमाणावर दंड वसुल केला जातो. मात्र जे एन्ट्री (पैसे) देतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालान केले जात नाही व दंड वसुल करीत नाहित, त्यामुळे शासनाचा मोठ्याप्रमाणात महसुल बुडत आहे. केवळ नागपुर विभागातील आरटीओ कडुन होत असलेला भ्रष्टाचार थांबवुन रेतीची अवैध वाहतुक थांबविल्यास करोडो रूपयांचा महसुल शासनाचा मिळु शकतो. तरी आपणांस या द्वारे विनंती करण्यात येत आहे की आपण यात विशेष लक्ष देउन हा भ्रष्टाचार त्वरित थांबवून शासनाचा महसूल बुडविणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मालमतेची चोकशी करून कारवाही करण्यासाठी माजी खनिकर्म महामंडळ अध्यक्ष माजी आमदार अविनाश वारजूरकर निवेदन दिले आहे

Previous articleकाँग्रेस चे युवा कार्यकर्ते सूरज बहुरिया गोळीबार करुण हत्या शहरात तनावचे वातावरण
Next articleवाढत्या रुग्ण संख्येत आणखी ५८ नव्या रुग्णांची भर बाधितांची संख्या ५५१ वर २२३ क्रियाशील रुग्ण कोरोनामुक्त रुग्ण संख्या २९८ तहसीलदार व नगरपरिषद प्रशासक भोयर नी केला कन्टेन्टमेन चा दौरा..