जुन्या वादातून दोघांनी मिळून भाला खुपसून केली एकाची हत्या, हिंगणी मिर्झापूरातील खळबळजनक घटना

215

दर्यापूर(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
जुन्या वादातून एका इसमास शिवीगाळ करुन त्याची भाला खुपसून हत्या केल्याची घटना दर्यापूर तालुक्यातील हिंगणी मिर्झापूर येथे घडली असून या घटनेमुळे गावात एकच खलबळ उडाली आहे
उत्तमराव सोळंके असे भाला खुपसून हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे उत्तमराव सोळंके यांचा गावातील विजय रघुनाथ तायडे वय 49 वर्ष व रघुनाथ बहाद्दर तायडे वय 68 वर्ष यांच्याशी जुना वाद होता याच जुन्या वादाच्या कारणावरुन विजय तायडे व रघुनाथ तायडे यांनी उत्तमराव सोळंकेस शिवीगाळ करुन वाद घातला वाद विकोपाला गेल्याने विजय व रघुनाथ यांनी मिळून उत्तमराव सोळंकेच्या छातीत डाव्या बाजूला भाला खुपसून रक्ताच्या थारोळ्यात खाली पाडले
गंभीर जखमी झालेल्या उत्तमराव यास उपचारासाठी दवाखान्यात नेत असतानाच वाटेतच मृत्यू झाला घटनेची माहिती दर्यापूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला
याप्रकरणी पोलिसांनी विजय तायडे व रघुनाथ तायडे विरुध्द कलम 302,504,34नुसार गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे या घटनेमुळे गावात एकच खलबळ उडाली आहे