दर्यापूर पो स्टे मध्ये रक्त तपासणी शिबीर, पोलीस व पोलीस अधिकारी व परिवारातील सदस्यांचा समावेश

दर्यापूर(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
पोलीस आपले कर्तव्य बजावत असतांना संपूर्ण महाराष्ट्रात पोलिसांना मोठया संख्येने कोरोना ची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे त्याची दखल घेत जिल्हा पोलीस अधिक्षक अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशान्वये पोलीस वेल्फेअर सोसायटीच्यावतीने दि 8 ऑगस्टला दर्यापूर येथील पोलीस स्टेशनच्या आवारात रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
पोलीसांचे कुटुंब सुरक्षित राहावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्या परिवारातील सदस्यांचेही रक्त परिक्षणासाठी रक्त घेण्यात आले यात 52 पोलीस व पोलीस अधिकारी व 15 पोलीसांच्या कुटुंबातील समावेश आहे पोलिसांची सि पी सि, एल एफ टी, के एफ टी, टी एफ टी, हिमोग्लोबिन, लिपिड प्रोफाइल व आय डी पी परीक्षण करण्यात येणार आहे अशी माहिती दर्यापूरचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांनी दिली या उपक्रमात पोलीस वेल्फेअर सोसायटी अमरावतीतर्फे सचिन चव्हान, चेतन गुलहाने, प्रविण इंगळे लॅबटेक्निशियन यांनी सहभाग घेतला