Home नागपूर स्विफ्ट कार ने दुचाकी ला दिली धडक एक घटनास्थळी मृत ,एक गंभिर...

स्विफ्ट कार ने दुचाकी ला दिली धडक एक घटनास्थळी मृत ,एक गंभिर जख्मी

221

 

कमलसिह यादव
पारीशवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

पारशिवन(ता प्र):-पाराशिवनी दुचाकीस्वाराची गाडीला समोरून धडक लागून एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एक जखमी झाला. ही घटना पारशिवनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आमडी फाटा पारशिवनी रस्त्यावरील नयाकुंड शिवारात येथे काल (७अगस्त) सायंकाळी ८-०० वाजता घडली. मृतकाचे नाव दुर्गेश हरीलाल नान्हे (१८), राहणार बोन्द्री तालुका रामटेक आहे. तर शैलेश अशोक नागपुरे (२४) राहणार बोन्द्री हा जखमी आहे.
मृतक एमएच ४0 / एपी २९७२ क्रमांकाच्या दुचाकीने पारशिवनी वरून आमडी मार्गे बोन्द्रीला जात होते. अशातच आमडी फाटा पारशिवनी रस्त्यावरील नयाकुंड समोर आमडी फाट्याकडून पारशिवनीकडे येणार्‍या स्विफ्ट डिजायर कार एम एच ४0 / बी जे ४५२१ ने भरघाव वगगाने येऊन समोरून धडक दिली. यात दुचाकीच्या मागे बसलेला दुर्गेश उंच उडून खाली पडला. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला व तो घटनास्थळी मृत पावला. लागलीच घटनेची माहिती पारशिवनी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी उत्तरीय तपासणीकरिता मृतदेह पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. जखमी शैलेश ला चारचाकी गाडी मालकाने दुसर्‍या एका वाहनाने ग्रामीण रुग्णालयात आणले. प्राथमिक उपचारानंतर त्याला नागपूर येथे हलविण्यात आले. पुढील तपास पारशिवनी पोलिस करीत आहे.
विशेष बाब म्हणजे या ठिकाणी रस्त्यावर भेगा पडलेला असल्याने रस्ताच्या एका बाजूला रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी एकेरी रस्ता आहे.स्विफ्ट डिजायर गाडीचालक परीक्षित बोराडे (४0) रा. शितलवाडी रामटेक हा स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाला.
आरोपीने ने आपले ताब्यातिल वाहन क्रमाकएम एच ३० बि जे ४५२१ ने भरघाव निष्काळजी पणाने अमोरा समोर धडक देऊन मृतकाचे वाहन क्रमांक एम एच ४० ए पी २९७२ला समोरून धडक देउन मृतकास मरण्यास कारणी भुत ठरले व शाैलेश नागपुरे गंभिर घायल केले
पारशिवनी पोलिस स्टेशन चा पोलिस उप निरिक्षक पळनाते ,सह पोलिस कर्मचारी नी कार व दुचाकी ताब्यात घेऊन वाहतुक सुरळीत केली, पारशिवनी पोलिसानी फिर्यादी राम अशोक नागपुरे यांची तोड़ी रिर्पाट नुसार व पोलीस निरीक्षक याचे आदेशाने अपराध क्रमांक २१६/२०दर्ज करून भा द वी ची कलम २७८,३०४(अ),३३८,भादवी ,सह कलम १८४मोटर वाहन कायदा गुन्हा नोद कारून पुढील तपास पोलिस निरिक्षक विलास चौहान यांचे मार्गदर्शनात सहायक उप निरिक्षक पळनाते कारित आहे

Previous articleक्लास वन बिडीओ चा प्रभार होता क्लास थी अधिकारी कडे.. गटविकास अधिकारी चंद्रकांत साबडे गेले होते पंचायत समिति वारे वर सोडुन..।। आमगांव शहरातील बार व रेस्टोरेंट साहेबाचे भेटण्याचे ठिकाण..।।नागरिकांचा आरोप…
Next articleदर्यापूर पो स्टे मध्ये रक्त तपासणी शिबीर, पोलीस व पोलीस अधिकारी व परिवारातील सदस्यांचा समावेश