मार्कंडा (कं) अगरबत्ती प्रशिक्षणाचा निरोप ३० महिला बचत गटांनी प्रशिक्षणाचा घेतला लाभ

31

 

उपसंपादक /अशोक खंडारे

चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत मार्कंडा( कं ) तर्फे बामनपेठ व मार्कंडा (कं) येथील बचत गटातील महिलांना जिल्हा उद्योग केंद्र गडचिरोली कडून सहा दिवसीय अगरबत्ती प्रशिक्षण देण्यात आले.
अगरबत्ती प्रशिक्षण शिबिराचा समारोप समूह गिताने स्वागत करून सौ रूपालीताई पंदिलवार जिल्हा परिषद सदस्य यांचे हस्ते करण्यात आला यावेळी सरपंच वनश्री चापले, ग्रा प.सदस्य विजय बहिरेवार, भारती पोटवार, अल्का गोसावी, ग्रामसेवक राजकुमार अनंतुलवार व प्रशिक्षक हिरापुरे उपस्थित होते.

मार्कंडा( कं) येथील ग्रामपंचायत मार्फत अगरबत्ती प्रशिक्षणाचा उपक्रम राबविल्याने गावातील महिला बचत गटांना रोजगाराची संधी मिळवून दिल्याने सर्व प्रथम सरपंच .उपसरपंच. ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे आभार मानले
गावातील प्रशिक्षण घेतलेल्या सर्व महिला बचत गटांनी अगरबत्ती उद्योग सुरू करावा व गावाचे नावाची संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या गावाची अगरबत्ती उद्योग गाव म्हणुन ओळख निर्माण करावी असे निरोप समारंभाच्या कार्यक्रमा प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रूपालीताई पंदिलवार यांनी मत व्यक्त केले.

यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंचा सौ वनश्री चापले यांनी गेल्या वर्षी पासून कोरोणाचे संकट चालू असल्याने गावात कोणत्याही प्रकारचा रोजगार नाही या करीता आपल्या मार्कंडा (कं) ग्रामपंचायतच्या अंतर्गत रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने महिला बचत गटांना पंधरावा वित आयोग निधीतून अगरबत्ती प्रशिक्षण देण्यात आला असल्याचे सांगितले .
प्रशिक्षण घेणाऱ्या बचत गटाच्या महिलांनी आम्हाला एक रोजगाराची संधी मिळवून दिल्याने महिला बचत गटाच्या वतीने अध्यक्ष विजया मुत्यलवार यांनी ग्रामपंचायत सरपंच सौ वनश्री चापले , उपसरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे आभार मानले
यावेळी गावातील सर्व महिला बचत गटाच्या अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.