क्लास वन बिडीओ चा प्रभार होता क्लास थी अधिकारी कडे.. गटविकास अधिकारी चंद्रकांत साबडे गेले होते पंचायत समिति वारे वर सोडुन..।। आमगांव शहरातील बार व रेस्टोरेंट साहेबाचे भेटण्याचे ठिकाण..।।नागरिकांचा आरोप…

सचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत..
आमगांव..आमगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबडे कोरोना काडात पंचायत समितिला वार्यावर सोडुन आपल्या गावी सुट्टीवर गेले होते. साबडे सुट्टीवर गेल्याने आमगांव पंचायत समिति गटविकास अधिकारी हा क्लास वन दर्जाचा असुन त्या पदाला समकक्ष अधिकार्यालाच प्रभार सोपवायला हवा होता.पन सामन्य प्रशासन विभाग व जिल्हा परिषदेतील पंचायत विभागाचा डोलारा एकच ठिकाण
असल्यामुळे पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी जे क्लास थ्री मध्ये येतात त्यांना प्रभार सोपवण्याचा काम सामान्य प्रशासन विभागाने केल्याने आत्ता सामान्य प्रशासन विभागातील भोंगड कारभारावर आमगांव तालुक्या मध्ये खुल्या स्वरूपात चर्चा सुरु आहे..पंचायत विस्तार अधिकार्याला दिलेल्या प्रभारामुडे वर्ग दोन व एकचे जे अधिकारी आहेत.त्यांना बाजु ला ठेवण्यात आला..पशुवैद्यकीय अधिकारी हे वर्ग एक चे अधिकारी कार्यरत असतांना व बालविकास प्रकल्प अधिकारी वर्ग दोनचे अधिकारी असतांना पंचायत समिति मध्ये विस्तार अधिकारी ला चार्ज का अश्या चर्चाना आमगांव तालुक्यात नागरिका मध्ये सुरु आहेत..