एलआयसी अधिवक्ता गणेश रासपायले यांचा आप मध्ये प्रवेश

169

प्रेम गावंडे
जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर

स्थानिक महापालिका निवडणूक जवळ येत असतांना LIC मध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय असलेले प्रतिष्ठित नागरिक गणेश रासपायले यांनी शनिवारी आप चे संस्थापक सदस्य युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे कोषाध्यक्ष भिवराज सोनी यांच्या प्रमुख उपस्थित आम आदमी पक्षात प्रवेश केला. काँग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळे लोकांना आता त्यात स्वारस्य राहिले नाही, अशावेळी आम्हाला आम आदमी पक्षात आशेचा किरण दिसला, असे प्रतिपादन नंतर बोलताना गणेश रासपायले यांनी केले. आता तर स्थानिक मनपात भाजपा चे अस्तित्व संपल्यातच जमा झाले आहे, असेही ते म्हणाले.
साईबाबा वार्ड येथील त्यांच्या कार्यालयात आयोजित या प्रवेश सोहळ्यात आपचे युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार यांनी त्यांना रितसर प्रवेश दिला. त्यांच्या प्रवेशाने चंद्रपुर मध्ये संघटन विस्तार करण्यात नक्कीच फायदा होईल असे मत जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे यानी यावेळी व्यक्त केले. एक सामान्य माणसाने राजकारणात उतरून राजकरणाची परिभाषा बदलवुन एक राजनीतिक क्रांति घडलेली आहे. असे आम आदमी पक्षाच्या केलेल्या कामातून आणि आपच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत पाहून आपण प्रभावित झालो व त्यातूनच पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे रासपायले म्हणाले. सध्या जिल्ह्यात आम आदमी पार्टी मजबूत होत असून अनेक नेते आणि सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने पक्षात सामिल होत आहेत.
आम आदमी पार्टीने मनपातिल अनेक विषय घेऊन आंदोलन सुरू केले, तेव्हापासून काणकोप-या पर्यंत सर्व स्तरांवर पक्षाला भरीव लोकसंपर्क आणि प्रतिसाद मिळत आहे. मनपा भागातही पक्षाची बाजू भक्कम बनू लागली आहे. जनतेची लूट करणा-या विद्यमान मनपातिल भाजपा सरकारला लोक कंटाळले आहेत परिणामस्वरूप लोक आपकडे आशेने पहात आहेत चंद्रपुरात आप वेगाने वाढत आहे असे युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार यांनी सांगितले.या वेळी सोशल मिडिया हेड राजेश चेटगुलवार शहर उपाध्यक्ष सिकंदर सागोरे ,अशरफ सैयद अली,चंदू माडुरवार,नितिन रासपायले, दिलीप तेलंग अन्य मान्यवर उपस्थित होते.