जागतिक बांबू दिनानिमित्त बांबूटेक ग्रीन सर्विसेस तर्फे डेबू सावली वृद्धाश्रमात एका कार्यक्रमाचे आयोजन……

126

प्रेम गावंडे
जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर

जागतिक बांबू दिनानिमित्त बांबूटेक ग्रीन सर्विसेस तर्फे डेबू सावली वृद्धाश्रमात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात संस्थेचे अन्नपूर्णा धुर्वे बावनकर, निलेश पाझारे, राजेश भलमे , अनिल दहागावकर यांच्यासह चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल रजा शेख, अमित अनेजा, अविनाश बलवीर ,प्रसिद्ध चित्रकार प्रवीण कावेरी , छायाचित्रकार नंदू सोनारकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती .कार्यक्रमात बांबूचे आर्थिक-सामाजिक, व्यवसायिक , औद्योगिक महत्व यावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच बांबूपासून निर्मित पर्यावरण पूरक टूथब्रश आणि दंतमंजन चे वितरण करण्यात आले. वृद्धाश्रमात बांबूची रोपे देखील लावण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन धनंजय तावाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बांबू टेक ग्रीन सर्विसेस आणि डेबू सावली वृद्धाश्रमाच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले .