महानेटच्या पोलवरुन पडुन कामगार युवक गंभिर जखमी, दिपक चौपाटी वरील घटना

 

वणी : परशुराम पोटे

वणी शहरात सद्या जिओ कंपनिच्या महानेटचे जाळे पसरत असुन जागोजागी खड्डे खोदुन पोल उभारुन केबल टाकण्याचे काम जोरात सुरु आहे.परंतु हे काम सुरु असतांना या कामावर काम करणार्या मजुरांना कोणतीही सुरक्षा यंत्रणा नसुन साधा सेप्टी बेल्ट सुद्धा देण्यात आले नाही. परिणामी कामगारांचा जिव धोक्यात आला आहे. अशीच एक घटना आज दि.८ आँगष्टला दुपारी ३ वाजताचे दरम्यान घडली आहे.
पिंटु अरविंद नेहारे (२२) रा.बोटोनी ता.मारेगाव असे गंभिर जखमी युवकाचे नाव आहे. आज शहरातील दिपक चौपाटी परिसरातील जत्रा मैदान पोलीस चौकी समोर दुपारी ३ वाजता पिंटु नेहारे हा मजुर महानेटच्या पोलवर बांबुच्या शिडीने चढुन केबल टाकत होता.केबल टाकतांना अचानक हुक निघाला व तो युवक २५ फुटावरुन खाली कोसळला. यावेळी त्याच्या डोक्याला गंभिर मार लागला असुन उपस्थित साथिदारांनी ताबडतोब ग्रामिण रुग्णालयात दाखल केले.परंतु गंभिर मार असल्याने त्याला येथिलच एका खाजगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला येथिल डाँक्टरांनी दिला.त्यानुसार पिंटुला यवतमाळ रोड वरिल एका मल्टीस्पेशाँलिस्ट हास्पिटल मध्ये नेण्यात आले.परंतु येथिल डाँक्टरांनीही त्या जखमीला नागपुर येथे नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे बातमी लिहेपर्यंत पिंटुला पुढिल उपचाराकरिता नागपुर येथे नेण्याची व्यवस्था सुरु होती.