Home गडचिरोली धानाचे बोनस तातडीने घा

धानाचे बोनस तातडीने घा

170

 

येनापुर प्रतिनिधी / तेजल झाडे

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने बोनस देण्यात आला नाही तर आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष संदीप तिमाडे यांनी दिला आहे.
चामोर्शी तालुक्याच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने गडचिरोली जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका असल्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. मात्र धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना बोनस मिळाला नाही. शेतीत रोवनी ,खत व जिवनावशक साहित्य खरेदी करन्यास पैसा आवशक आहे त्यामुळे कुटुंब कसे जगावे असा प्रश्न या तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे. त्यामुळे तातडीने बोनस देण्यात यावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा संदीप तिमाडे यांनी केला आहे.

Previous articleनरसाळा येथील दोन घरी ५४ हजारा च्या दागिन्याची घरफोडी.
Next articleमहानेटच्या पोलवरुन पडुन कामगार युवक गंभिर जखमी, दिपक चौपाटी वरील घटना