पुणे जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम विभाग माजी सभापती प्रवीण भैय्या माने यांच्या हस्ते पिंपरी बुद्रुक येथे नव्याने होत असलेले प्राजक्ता इंजीनियरिंग व इलेक्ट्रिकल उद्योग समूहाचे उद्घाटन थाटामाटात संपन्न झाले.

0
187

 

नीरा नरसिंहपुर दिनांक 8 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,

पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे कल्याण भंडलकर यांच्या कुटुंबाच्या वतीने प्राजक्ता इंजीनियरिंग व इलेक्ट्रिकल हा उद्योग समूह  सुरू करण्यात आलेला असून या नव्याने पिंपरी बुद्रुक येथे होत असलेल्या  उद्योग समूहाचे उद्घाटन माजी सभापती प्रवीण भैय्या माने यांच्या हस्ते संपन्न झाले. या उद्घाटन प्रसंगी प्रवीण भैय्या माने म्हणाले की शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक शेतीच्या कामासाठी अकलूज  इंदापूरला जाण्यासाठी जी पायपीट करावी लागत होती तोच उद्योग समूह पिंपरी बुद्रुक मध्ये होत असल्याचे आनंद व्यक्त केले पत्रकार बाळासाहेब सुतार यांनी प्रवीण भैय्या माने यांच्याकडे ग्रामीण रुग्णालयाच्या सुशोभी करण्यासाठी मागणी केली असता पेविंग ब्लॉक व वॉल कंपाऊंड साठी निधी देऊन काम पूर्ण करून देईन असे आश्वासन या वेळी  देण्यात आले . या उद्घाटन प्रसंगी पिंपरी बुद्रुक मधील भंडलकर कुटुंब व ग्रामस्थ, कल्याण भंडलकर, व्यंकट बोडके, बालाजी बोडके, मारुती सुतार, संतोष साबळे, महेश सुतार, जगुमामा मोहिते, भाऊ रंधवे, भागवत भंडलकर, निवृत्ती भंडलकर, आप्पा भंडलकर,या सर्वांच्या उपस्थित राहून पिंपरी बुद्रुक येथे नवीन होणार्‍या उद्योग समूहाचे उद्घाटन माजी सभापती प्रवीण भैय्या माने यांच्या हस्ते संपन्न झाले.

————————————————–फोटो:-ओळी- पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे प्राजक्ता इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल समूहाचे उद्घाटन करीत असताना माजी सभापती प्रवीण भैय्या माने साहेब उपस्थित ग्रामस्थ.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160