Home रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील पुर भरलेल्या रहिवाशी भागात तात्काळ फवारणी करा गाव विकास...

रत्नागिरी जिल्ह्यातील पुर भरलेल्या रहिवाशी भागात तात्काळ फवारणी करा गाव विकास समितीचे जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मील काझी यांची मागणी

159

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी- मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात अनेक सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली होती,यावेळी अनेक रहिवाशी भागात देखील पाणी साचले होते,परिणामी ज्या भागात पुराचे पाणी शिरले होते त्या भागात तातडीने साथ रोग नियंत्रक फवारणी करावी अशी मागणी गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा चे मुझम्मील काझी यांनी केली आहे.
अनेक गावांमध्ये पुर परिस्थितीजन्य स्थिती होती. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. या पुरातुन कचरा व तसेच अन्य प्रकारचा कचरा मानवी वस्तीत शिरला असुन तो तसाच पडुन आहे. प्रशासनाने जाहिर केलेल्या पुर बाधित क्षेत्रात वेळीच फवारणी करणे गरजेचे असल्याचे मुझम्मील काझी यांनी म्हटले असून आधीच कोरोनासारख्या आजाराची भिती असतानाच आता या पुराच्या घाणीमुळे डासांची निर्मिती होऊन डेंग्यु, मलेरिया यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.वेळीच परिस्थितीचे गांभिर्य ओळखुन प्रशासनाने पुर भरलेल्या भागात साथ रोग नियंत्रक फवारणी करावी, अशी मागणी मुझम्मील काझी यांनी गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटनेच्या वतीने प्रशासनाकडे केली आहे.

*दखल न्यूज भारत*

Previous articleआचार्य पदवी प्राप्त प्रा संजय डी फुलझेले यांचा सत्कार
Next articleपुणे जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम विभाग माजी सभापती प्रवीण भैय्या माने यांच्या हस्ते पिंपरी बुद्रुक येथे नव्याने होत असलेले प्राजक्ता इंजीनियरिंग व इलेक्ट्रिकल उद्योग समूहाचे उद्घाटन थाटामाटात संपन्न झाले.