आचार्य पदवी प्राप्त प्रा संजय डी फुलझेले यांचा सत्कार

अशोक खंडारे विभागीय प्रतिनिधी
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी येथील प्र. प्राचार्य तथा ग्रंथपाल पदावर प्रा. संजय डी. फुलझेले यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ , नागपूर. येथील ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयात आचार्य पदवी प्रदान करण्यात आली.त्यांचा प्रबंधाचा विषय होता.” इन्फॉर्मेशन नीड अँड सिकिंग बिहेवियर आँप फॅकल्टी मेंबर ऑफ सोशल सायन्सस अँपिलेटेड कॉलेजेस ऑफ गोंडवाना युनिव्हर्सिटी, गडचिरोली. त्यांना मार्गदर्शक म्हणून प्रा.डाँ. संजय साबळे ग्रंथपाल. आनंद निकेतन महाविद्यालय,वरोरा. यांचे मार्गदर्शन लाभले त्याबद्दल वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी चे उपाध्यक्ष माननीय बबलू भैया हकीम यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थित माननीय हकीम साहेब सचिव,वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी. सौ चम्मा हकीम. सौ. शाईन भाभी हकीम महिला कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ,गडचिरोली.प्राचार्य. पठाण सर, प्राचार्य. पठाण मॅडम, प्रा.हकीम सर,प्राचार्य. मंडल सर, प्राचार्य. खराती सर’ प्राचार्य. डॉ. मंडल सर तसेच महाविद्यालयातील कर्मचारी प्रा.डाँ.खुणे सर, प्रा .कोरडे सर तसेच महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक कर्मचारी त्याच प्रमाणे श्री. राज लखमापूर, श्री. निलेश नाकाडे श्री एम. डी. मुस्ताक, श्री. गोर्ला श्री एस.टी. बच्छाड श्री. विनोद तोरे. श्री .संतोष बारापात्रे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते