खेडीचा खडकी नाल्यावरील पुल पुराच्या पाण्याने वाहुन तुटला खेडी ते अजनी चा संजर्क तुटला

120

 

कमलसिहं यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत ,नागपुर

पाराशीवनी(ता प्र) : – तालुका तिल् खेडी (खोपडी) गावा वरून आजणी रामटेक कडे जाणा-या रस्त्या वरील खडकी नाल्यावरील पुल काल रात्रि चा झालेल्या पाऊसाने नाला भरून वाहुन येथील पुल पाऊस पुराच्या पाण्याने वाहुन तुटल्याने परिसरातील शेतक-याना शेतीवर, आजनी व रामटेक ला जाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
खेडी (खोपडी) वरून आजनी कडे जाणा-या मुख्य रस्त्यावरील खडकी नाला पुलाचे बांधकाम अंदाजे २५ वर्षा पुर्वी झाले होते. नंतर २ वर्षा अगोदर पुलावर ची स्लॅब उखडल्याने दुरूस्ती करण्यात आली होती. गुरूवार व शुक्रवार रात्रि(दि.६ व अगस्त ) ला झालेल्या जोरदार पावसाने खंडाळा केरडी कडुन येणारा खेडी (खोपडी) गावाजवळील खडकी नाल्याला जोरदार पुर आल्याने खेडी ते आजनी, रामटेक कडे जाणा-या मुख्य रस्त्यावरील पुला वरून पुराचे पाणी वाहुन पुल तुटुन स्लॅब पुर्ण वाहुन गेल्याने येणे जाणे बंद झाले आहे. गावक-यांचा हा रस्ता वर्दळीचा असुन एकमेव पुल असल्याने गावक-या चे शेतात व आजनी, रामटेक ये-जा बंद होऊन संपर्क तुटल्याने या पुलाची व्यवस्था त्वरित करून देण्याची मागणी सुधाकर उमाळे, पवन कोरकंचु ,राहुल वानखेडे, श्रीकांत चौधरी, सुनील अमोल नागपुरे, आकाश कोचे, आशिष कोचे, निकेश घरजाळे, लक्ष्मीकांत घरजाळे, ठाकरे, संतोष काळे, सुनिल काळे गजानन काळे राजु कोचे मंगेश कडु नंदु इगळे नारायण ठाकरे, तसेच या रोडवरील धान गिरनी मालक, खेडी, आजनी, नगरधन येतील शेतकरी सह येजा करना -या नागरीकांनी नवीन पुलाची पुरानी मागणी पुन्हा जोर धरली