Home Breaking News जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा महागांव येथे सेवानिवृत्त शिक्षक सत्कार तथा निरोपिय...

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा महागांव येथे सेवानिवृत्त शिक्षक सत्कार तथा निरोपिय सत्कार समारंभ

246

 

प्रतिनिधी
राहुल उके
दखल न्यूज भारत

महागांव: दिनांक 8 ऑगस्ट 2020 रोज- शनिवारला जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा महागाव येथे- सेवानिवृत्त शिक्षक सत्कार व निरोप समारंभ.

महागाव केंद्रांतर्गत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा सत्कार समारंभ तथा महागाव केंद्राच्या केंद्रप्रमुख केंद्र कवलेवाडा *कुमारी एम .आर .वैष्णव मॅम* यांचा निरोपीय सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन ,महागाव केंद्रातील सर्व शिक्षकांचे सहकार्याने संपन्न झाला.
यामध्ये *सेवानिवृत्त सत्कार मुर्ती*
श्री. डब्ल्यू. के मस्के से. उ. मे.
श्री. जी. एस. नाकाडे से. नि. मुख्या. व श्री .एल. आर. बोरकर से. नि. मुख्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री जे.के.काळसर्पे सर माजी पंचायत समिती सदस्य कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री साखरे सर प्राचार्य श्यामा प्रसाद विद्यालय महागाव,
प्रमुख अतिथी मा. श्री भारत बोरकर सर प्रभारी केंद्रप्रमुख कु.आर. एस. मानकर सं. शि.
मा.पी.कापगते सर मुख्याध्यापक जि. प. शाळा बोरी
मा. नेवारे सर मुख्या. वडेगाव
मा. के आर हातझाडे मुख्या माहुरकुडा
मा. फुलबांधे सर मुख्या महागाव
मा. एम के नाकडे मुख्या सिरोली
मा. नान्हे सर मुख्या मालकनपुर
मा. सरादे सर मुख्या प्रिय. प्रा.शा. महागाव,
मा. हुमने सर मुख्या. सावित्रीबाई फुले प्रा.शा. महागाव
मा. शेंडे सर मुख्या बंध्या
मा. गजबे सर पं.दे.विद्या.येरंडी महागाव,
तथा सर्व मुख्याध्यापक वृंद

कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वती यांच्या चित्राचे पूजन करून करण्यात आले.
माननिय साखरे सर प्राचार्य श्यामाप्रसाद विद्यालय महागाव यांनी उद्घाटकीय भाषणातून शिक्षक, अधिकारी आणि समाज यातील परस्पर सहसंबंध विषद केले.
प्रमुख अतिथी माननीय पी .कापगते सर मुख्याध्यापक जि प शाळा बोरी यांनी सत्कार मूर्ती माननीय श्री डब्लू. के. मस्के सर , माननिय श्री जी.एस.नाकाडे सर यांच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण कथन केले. त्याच प्रमाणे शिक्षकांच्या अंगी असलेले सुप्त गुण विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचतात याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले.
सत्कार मूर्ती श्री मस्के सर त्याचप्रमाणे श्री नाकाडे सर यांनी आपल्या सेवा काळातील अनुभव कथन केले.
तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून मा. श्री जे. के. काळसर्पे सर माजी प. स. सदस्य यानी शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय यातील सहसंबंध विशद केले.
निरोपिय सत्कार मुर्ती कुमारी एम. आर. वैष्णव मँडम यांनी या केंद्रातील अनुभव कथन केले व सदिच्छा म्हणून केंद्रासाठी अमुल्य अशी भेट दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनियुक्त केंद्रप्रमुख श्री. भारत बोरकर सर यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे संचालन श्री. औरासे सर सहा. शिक्षक जि. प. शाळा बुटाई नं.1 यांनी केले.
तर कार्यक्रमाचे आभार श्री उमेश ठाकरे सर जि. प. शाळा सिरोली यांनी केले.
सर्व शिक्षकांच्या सहकार्याने आणि सत्कार मुर्तीच्या पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आजच्या कार्यक्रमाची सांगता सामाजिक अंतर पालन करून यशस्वी रित्या करणा आली.

Previous articleभाजपा महिला मोर्चा ठाणे ग्रामीणच्या जिल्हा अध्यक्षा शीतल तोंडलीकर यांचा आगळावेगळा अनोखा उपक्रम! कोविड योद्ध्यांचा थेट घरी जाऊन केला सन्मान
Next articleसाक्री–धुळे रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या जागीच ठार