Home महाराष्ट्र भाजपा महिला मोर्चा ठाणे ग्रामीणच्या जिल्हा अध्यक्षा शीतल तोंडलीकर यांचा आगळावेगळा अनोखा...

भाजपा महिला मोर्चा ठाणे ग्रामीणच्या जिल्हा अध्यक्षा शीतल तोंडलीकर यांचा आगळावेगळा अनोखा उपक्रम! कोविड योद्ध्यांचा थेट घरी जाऊन केला सन्मान

219

 मुरबाड दि.८.(सुभाष जाधव): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संकटकाळात अनेक कोविड योद्धा यांनी आपला जीव धोक्यात घालून व जीवाची पर्वा न करता वेगवेगळ्या प्रकारे लॉकडाऊन व अनलॉकडावूनमध्ये विशेष कार्यक्रम राहून मुरबाड शहरातील अनेक कोविड योद्धा यांचा नुकताच भाजपा महिला मोर्चा ठाणे ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षा शीतल तोंडलीकर यांनी भाजपा महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा उमाताई खापरे, भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील व मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड योद्धा यांच्या थेट घरी जाऊन व मानपत्र देऊन त्यांच्या अतुलनीय कामगिरीचा गौरव केला व त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.एक आगळावेगळा सन्मान झाल्याने अनेक कोविड योद्धा भारावून गेले होते. यावेळी मुरबाड शहरातील प्रदोष हिंदुराव( समर्थ सुपर मार्केट), कविता सोनावणे ( परिवहन महिला अधिकारी, मुरबाड बस आगार), मुरबाडचे सहाय्यक पोलीस फौजदार सावंत, पोलीस कॉन्स्टेबल नंदकुमार दळवी, पोलीस कॉन्स्टेबल सय्यद , ग्रामीण रुग्णालय मुरबाडचे डॉक्टर फड, एन . टी. टी. एफ. कोरोन्टाईन सेंटरचे अमर माने, विद्यार्थीसेना मनसे मुरबाड शहर अध्यक्ष देवेंद्र जाधव, पत्रकार बाळासाहेब भालेराव, भरत दळवी तसेच अनेक डॉक्टर, परिचारिका, औषधालय विक्रेते, बँक अधिकारी, रुग्णवाहिका चालक, रक्तपेढी डॉक्टर व कर्मचारी यांचा मानपत्र देऊन भाजपा महिला मोर्चा ठाणे ग्रामीण यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना ठाणे जिल्ह्यातील ८ मंडळातील तब्बल ३००० कोविड योद्धा यांचा भाजपा महिला मोर्चा यांच्या वतीने सन्मान केला जाणार असल्याचे जिल्हाध्यक्षा शीतल तोंडलीकर यांनी प्रतिपादन केले . रक्षाबंधन ते १५ ऑगस्टपर्यंत संपूर्ण ठाणे जिल्हा ग्रामीणमधील कोविड योद्धा यांचा गौरव करणार असल्याचे शीतल तोंडलीकर यांनी यावेळी सांगितले. तसेच भाजपा महिला मोर्चाच्या वतीने लोकांना काळजी घेण्याचेही आवाहन केले. कोविड योद्धा डॉ. किरण शेळके यांनी भाजपा महिला मोर्चा यांनी आमच्या कामाची दखल घेतल्याबद्दल आभार मानले. यावेळी भाजपा महिला मोर्चा ठाणे ग्रामीण बदलापूर शहर अध्यक्षा मंगळ दळवी व त्यांच्या सर्व पदाधिकारी तसेच मुरबाडमधील भाजपा महिला मोर्चाच्या कामिनी गायकवाड, शिल्पा देहरकर, सुश्मिता तेलवणे, निकिता खडकबाण आदी उपस्थित होत्या. ३००० कोविड योद्धा यांचा सन्मान करण्यासाठी सरसावलेल्या शीतल तोंडलीकर यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा.

Previous articleओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी करा! वंचित बहुजन आगाडीचे तहसीलदार यांना निवेदन
Next articleजिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा महागांव येथे सेवानिवृत्त शिक्षक सत्कार तथा निरोपिय सत्कार समारंभ