ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी करा! वंचित बहुजन आगाडीचे तहसीलदार यांना निवेदन

120

 

अकोट शहर प्रतिनिधी स्वप्नील सरकटे

– वंचित बहुजन आघाडी अकोट तालुकाच्या वतीने देशामध्ये ओ.बी.सी समाजाला मंडल कमिशन आयोगानुसार २७ टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली असून मेडिकलच्या पदवीधर व पदवीत्तर स्तरातील अभ्यासक्रमामध्ये प्रवेश प्रक्रियेतील आरक्षण नाकारण्यात आले आहे. या प्रवेश प्रक्रियेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात असणाऱ्या वैद्यकीय संस्थांना ओ.बी.सी आरक्षण लागू केले नसल्याने सदर परिणाम झाला आहे. तरी शासनाच्या या आरक्षणविरोधी आरक्षणाबाबत मंडल कमिशन नुसार २७% आरक्षण पूर्ववत ठेवण्यात यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी , वंचित बहुजन महिला आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित तालुका अध्यक्ष संदीप आग्रे यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे राष्ट्रपती ह्यांना देण्यात आला.

यावेळी शैलेश धांदे,संजय पुंडकर, निलेश झाडे पं.समिती उपाध्यक्ष महिला अध्यक्ष सुनिता ताई हिरोळे, शञुघन नितोने,गजानन दाडे, रामकृष्ण मिसाळ,गौतम पचांग,सिधेक्ष्वर बिराड,भुषन घनबहादुर, भावराव धांदे,पाचपाटील तसेच वंचित बहुजन आगाडीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थिति होते.