मार्कंडा (कं) येथे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलास जवाबदार कोण ? वन कर्मचाऱ्यांना जंगलात मेंढपाळ वास्तव्य करीत असल्याची माहिती नव्हती का ? वन कर्मचाऱ्यांनी चिरीमिरीत त्यांना बस्तान मांडन्यास सांगितले

549

 

उपसंपादक /अशोक खंडारे

चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा ( कं) येथील वनविकास महामंडळ च्या कंपार्टमेंट नंबर २१७ मध्ये मेंढपाळ हे आपल्या मेंढ्यासह तिन ते चार दिवसांपासून तिन कुटूंब वास्तव्यास राहत होते. ते मेंढ्याचराई करीता आपल्या मुलाबाळासोबत जंगलात फिरताना मृतक मनोज तिरुपती देवावार वय ७ वर्ष रा. भंगाराम तळोधी याला बिपट्याने ठार केले. मात्र प्रश्न असा उपस्थित होते की, जंगलात त्यांना कोनत्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बस्तान मांडल्यास सांगितले . जर सांगितले नाही तर ते जंगलात वास्तव्यास आसुनही वन अधिकारी अनभिज्ञ कसे ,याचा अर्थ वन कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना काहीतरी कसूर करीत आहेत हेच या प्रकरणावरून सिद्ध होत आहे. जर वनाधिकारी यांनी त्या मेंढपाळांना लगेच जंगलांतून हाकलले असते तर हा अनर्थ कदाचित टळला असता अशी खमंग चर्चा परीसरात सुरु आहे.

चामोर्शी तालुक्यातील आष्टी शहरापासून जवळच असलेल्या मार्कंडा (कं) येथील वन विकासाच्या 217 कंपार्टमेंट मध्ये तीन चार दिवसापासून वास्तव्य होते व मेंढ्या चराईसाठी आपल्या आई सोबत मृतक नामे मनोज तिरूपती देवावार रा. भंगाराम तळोधी ता.गोडपिपरी जिल्हा.चंद्रपूर असे असून हा मुलगा गेला
असता बिबट्याने त्याचेवर हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना आज दिनांक 15 नोव्हेंबर 2021 रोजी ही दुर्दैवी घटना घडली वन विकासाच्या कंपार्टमेंट मध्ये तीन कुटुंब तीन चार दिवसापासून वास्तव्य करीत असल्याची माहिती या कंपार्टमेंटमध्ये कर्तव्यावर असलेल्या वन कर्मचाऱ्याला माहिती नाही का ? या कंपार्टमेंटमध्ये वन कर्मचाऱ्यांनी तीन चार दिवसापासून जंगलात फिरकलेच नाही का ? लगेच या मेंढपाळ कुटुंबांना इथून वन कर्मचाऱ्यांनी हाकलून लावले असते तर आज ही दुर्दैवी घटना घडली नसती अशी चर्चा आष्टी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे