रवी मुलुरचक गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात यावा अन्यथा दि २० सतेबरला ठिक १२ वाजता आरमोरी जुन्या बसस्टँड समोर चक्काजाम आंदोलन गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात गावकऱ्यांचा जिल्हाधिकारी यांना निवेदनातून ईशारा

42

 

देवानंद जांभूळकर जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

आरमोरी – तालुक्यातील रवी मुलुरचक हे गावे गेल्या चार वर्षांपूर्वी अरसोडा ग्रामपंचायत मध्ये होते परंतु अरसोडा गाव हे आरमोरी नगरपरीदेत समाविष्ट झाल्याने रवी मुल्लुरचक गावे प्रशासनाने वारेवर सोडल्यामुळे सविधानीक हक्कापासून दोन्ही गावे वंचित आहेत यात नागरीकांना सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून आरमोरी पंचायत समिती अंतर्गत अरसोडा, रवी , मुल्लूरचक ही गावे मिळून अरसोडा ही गट ग्रामपंचायत होती. परंतु २०१८ मध्ये आरमोरी नगरपरीषदेची निर्मिती झाल्यानंतर अरसोडा हे गांव आरमोरी नगरपरीषदेमध्ये समाविष्ट करण्यात आले. तेव्हा पासुन रवि व मुलूरचक ही गावे ग्रामपंचायतीच्या संविधानिक अधिकारापासून वंचित आहेत. येथील नागरीकांना आवश्यक असलेले दाखले मिळत नसल्याने नागरीकांना घरकुल विज पाणी रोजगार सिचन शेतीपयोगी फळबाग शसकीय योजनांचा लाभ मिळत नाही. दोन्ही गावे जंगलव्याप्त असुन या गावांची लोकसंख्या १००० एवढी आहे.रवि ते कासवी अंतर ८ किलोमीटर आहे.त्यामुळे कासवी ग्रामपंचायतीला ही गावे जोडणे गैरसोयीचे आहे. या दोन्ही गावांच्या परीसरात वाघासारख्या हिंस्त्र प्राण्यांचा वावर असुन गांवकरी रात्रो व दिवसा वाघाड्या दहशतीत वावरत असताना वारंवार निवेदने देऊनही दखल घेतली नसल्यामुळे देसाईगंज तालुक्यातील गांधीनगर यांना आठशे नवशे लोकसंख्येच्या आधारावर स्वतत्र ग्रामपंचायतीचा दजा देण्यात आला त्याच आधारावर विशेष बाब म्हणुन रवि व मुलूरचक या ग्रामपंचायतींना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात यावा अन्यथा दि २० सतेबर ला ठिक १२ वाजता आरमोरी येथील जुन्या बसस्टँड समोर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी दिला आहे
यावेळी सुरेश मरापा रामकृष्ण तामसटवार पपीता मरापा शामराव विठोबा कामथे हरीचद्र कामथे तामरशा मरापा शामराव शिलार शिवदास चौके.ब्रम्हदास कवासे सजय कामथे श्रीधर मरापा प्रल्हाद कवासे कारुजी चडीकार निलकंठ सावसाकडे मुखरु सावसाकडे प्रदिप सावसाकडे लक्ष्मण कवासे रमेश चौधरी मुलिधर टिवटे शैलेश मरापा रविंद्र कामथे शंकर दिघोरे अमित कामथे सुमित्रा तामसटवार रेश्मा नारनवरे रुपा चौके मदा दिवटे वैशाली ठाकरे अश्वीता दिघोरे यासह शेकडो रवी मुल्लुरचक येथील गावकरी उपस्थित होते.