पडियालजोब ग्रामसभेनी आखली गावातील शिक्षणांची नवी योजना

234

 

प्रतिनिधी /लोचन कोल्हे
ता. कोरची

कोरची : गडचिरोली जिल्हयाचा अतिदुर्गम तालुक्यातील पडियालजोब हा गाव कोरचीवरून सुमारे 15 कि.मी.अंतरावर अतिसंवेदनशिल क्षेत्रात वसलेला आहे.या गावात पुर्णतह : चाळीस ते पंचेचाळीस कुटुंबांचा आदिवासी लोकांची वसाहत आहे.
गेल्या पाच ते सहा महिनापासुन देशात कोरोणाचा महामारी पादुर्भाव पसरल्याने माणसांचा जिवनांवर अनेक समास्य निर्माण झालेले आहेत.त्यातीलच एक प्रमुख समास्य म्हणजे शिक्षण.कोरोणामुळे मुलांचे शालेय शिक्षणाचे परीक्षा सुध्दा झाले नाही .तेव्हां खेडयातील मुलांचे भविष्य उज्जवल कसा होईल .असे विचार पडियालजोब गावातील श्री राजाराम नैताम उपसरपंच यांचे मनात आलं .राजाराम यांनी बाहेर शाळेत शिकणा-या मुलांची यादी केली.तेव्हा राजारामला शासकिय आश्रम शाळा मसेली ,घोट, इंग्लिश मिडियम स्कृल नागपुर मध्ये इयत्ता पाचवीत 2मुली,1मुलगा ,सहावीत 1मुलगी ,2 मुले,सातवीत 1मुलगी ,2मुले आठवीत 1मुलगी ,3मुले ,नववीत 3मुली ,3मुले आणि दहावीत 2मुले,2मुले असे एकुण 23 मुलांची आकडेवारी यादी तयारी झाली.शासन दुर्दर्शनांद्वारे 1ते8 पर्यंताचे शिक्षण मुलांना दिली जाते.परंतु या पडियालजोब गावात तीन ते चार पेक्षा जास्त टिव्या गावात नाहीत .त्यातला त्यात या गावातील सर्व कुटुंबा शेतीवर व जंगलावर अवलुंन आहेत .तेव्हा या मुलांचे आई वडिल मुलांना शेतावर ,जंगलावर शिवाय गुरेढोरे चारायला सागांयचे हे राजाराम उपसरपंचाला पठेना .राजरामने हि गावातील मुलांचा शिक्षणावर भविष्यात होणारा परिणामही पडियालजोब ग्रामसभेतील अध्यक्ष ,सचिवासमोर पटाऊन सांगितले.
एके दिवसी संध्याकाळी गावातील सगळे लोक शेतातुन ,जंगलातुन परतल्यानंतर पडियालजोब ग्रामसभेतील अध्यक्ष ,सचिवांनी नेहमी प्रमाणे घंटी वाजविले.तातडीची ग्रामसभा गावात भरली .ग्रामसभेत गावातील शिक्षणासंदर्भात नवी उपाययोजनावर सविस्तर चर्चा झाली .गावातील मुलांना गावातच शिक्षण दयावा .गावातीलच शिक्षण सेवकांची नियुक्ती करावे .शिक्षणासाठी लागणा-या साहित्य ,किरकोळ खर्च तसेच शिक्षणसेवकांचे मानधानही ग्रामसभेचा राखुन ठेवलेला निधीतुन देण्याचा ठरावसह निर्णय घेण्यात आले .जोहन मन्साराराम पोरेटी ,कु.शामबाई चमारू पोरेटी हे दोघेही फायनलपर्यंत शिक्षण घेतले आहेत.यांचे गावातच ग्रामशिक्षण सेवक म्हणुन नियुक्ती करुन यांचे मानधान प्रति दिवस शंभर रुपये प्रमाणे देण्याचे ठरविण्यात आले.कारण या गावातील शेतात काम करणा-या मजुरांचाही दर प्रति दिवस शंभर रुपये असल्याने तेवढाच दर शिक्षण सेवकांना दयायचं ठरविण्यात आला.ग्रामशिक्षणसेवकांचे मानधान बँक खात्यात दयायचे ठरले.पण हि शाळा गेल्या काही महिनांपासुन गावातील शाळेत न शिकविता गावाचा मध्यस्थी असलेला राजारामजी नैताम यांचे घरी भरविली जाते.या गावाचा शाळेत शासनाने कोवीळ 19चा ठरविलेला नियमांचा पालन करुनच भरविली जाते .या शाळेची कालावधी शासन शालेय शिक्षण जोपर्यंत अनुमती देत नाही तोपर्यंत ग्रामसभा पडियालजोब हि शाळा सुरू ठेवेल .या शाळेची नियंत्रण ग्रामसभा अध्यक्ष ,सचिव ,राजाराम नैतामसह गावातील लोक करित आहेत.