चिंचगुंडी येथील वीज पडून मृतकाच्या कुंटुबाला आर्थिक मदत… राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेता चंद्रशेखर कडारला यांचे कडून….

315

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम: अहेरी तालुक्यातील चिंचगुंडी गाव मागील आठवड्यात कापसाच्या पिकाला औषधी टाकण्यासाठी गेलेल्या मजुरांवर दवीज कोसळल्याने चिंचगुंडी येथील पोसक्का चिंना तोटावार हे जागीच ठार झाले.दुपारचे जेवण करून विश्रांती घेताना अचानक वीज व गडगडासह पावसाला सुरुवात झाला होता.पावसापासून बचाव करण्यासाठी आंब्याच्या झाडाखाली जाऊन सदर सर्व मजुर उभे होते.तेव्हाच वीज कोसळल्याने 1 जण ठार झाली अन्य मजूर जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
या घटनेतील मृतक कुटुंबाला अहेरी विधानसभा क्षेत्रात चे आमदार मा.धर्मरावबाबा आत्राम आणि माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम (हलगेकर)यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेता मा.चंद्रशेखर कडारला यांचं हस्ते आर्थिक मदत केले आहे.