ग्रामपंचायती वर स्थायी प्रशासक नियुक्त करा. गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव यांच्या नेतृत्वात नागरिकांची जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे मागणी.

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(गडचिरोली जिल्हा)

ग्रामपंचायत स्तरावरील कोरोनाच्या प्रादुर्भावादामुळे निवडणूका पुढे ढकलण्यात आल्याने आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा गावासह गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतचा कारभार चालविण्यासाठी पंचायत समिती स्तरावरुन शासकीय प्रशासक नियुक्त करण्यात आले. परतु एकाच कर्मचाऱ्यांकडे अनेक ग्रामपंचायतचा कारभार देण्यात आल्याने हप्त्यातुन एकही दिवस ग्रामपंचायतला वेळ देऊ शकत नाही त्यामुळे गावातील नागरिकांना कागदपत्रे मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असून अनेक नागरीकांना ग्रामपंचायतच्या कागदपत्रा अभावी योजनापासून मुकावे लागत असल्याकारणाने शासनाने स्थायी प्रशासकाची नियुक्ती करावी अशी मागणी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेसचे सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात नागरीकानी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतिच्या सरपंच पदाचा कार्यकाळ गेल्या काही महीन्यापुवी पाच वर्ष पुर्ण झाल्याने मार्च महीण्यात ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर होऊन मार्च महीण्यातच अर्ज सादर करुन निवडणूक कार्यक्रम जाहिर केलेला होता परंतु 19 मार्चलाच अर्ज छाननीच्या दिवसी देशासह राज्य भरात कोरोना ह्या संसर्गजन्य रोगांच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत पदाधिकारी निवडणुका पुढे ढकलन्यात आल्या व आरमोरी तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायत वर पंचायत समिती स्तरावरुण ग्रामपंचायतचा कारभार चालविण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशासक म्हणुन नियुक्ती करण्यात आले. परंतु एकाच कर्मचाऱ्यांकडे आठ ते नऊ ग्रामपंचायतचा कारभार तोही चाळीस ते पन्नास किमीचा अंतरावरील असल्यामुळे नागरीकांना लाबदुरुन वारंवार ग्रामपंचायत दाखल्यांसाठी चकरा मारावे लागतो तरीसुध्दा दाखले मिळण्याची शक्यता कमि असल्यामुळे वेगवेगळ्या योजनेच्या लाभापासून वंचित राहुन विनाकारण नागरीकांचा कोरोनाच्या कठिण परस्थितीत वेळत पैसा व्यर्थ जात असुन याच बरोबर गाव विकासचे अनेक कामे स्थायी प्रशासक नसल्यामुळे रखडले असल्याने शासन स्तरावरून नागरीकांच्या सर्वांगिण विकासाचा विचार करता आरमोरी तालुक्यासह जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला स्थायी प्रशासकाची नियुक्ती करुण गाव विकासाला चालना द्यावी अशी मागणी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात नागरीकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे. यावेळी नरु वझाडे, नरेंद्र गजभिये, नानाजी मांढरे, लक्ष्मण सडमाके, प्रशात कहालकर, भैयाजी कन्नाके, राहुल राऊत, नितीन मडावी, चेतन कुमरे, सोनल मांढरे, रत्नाजी पेन्दाम, भाऊराव मडावी, विश्वात सोनबावणे, जितेंद्र भोयर, प्रदिप सडमाके, सचिन मडावी, गौतम मेत्राम, जुमनाके, सोनबावणे आदि उपस्थित होते.