उमेद अंतर्गत ग्रामीण भागात काम करणाऱ्या आय.सी.आर.पी.महिला कर्मचारी यांचे 18 महिन्या पासून मानधन थकीत…. 24 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद कार्यालय समोर तीव्र निदर्शने करण्या चा इशारा.. कॉ.झोडगे यांचे व्याहाड येथील आयोजित मेळाव्यात आव्हान

399

 

ऋषी सहारे
संपादक

सावली:–महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (उमेद)अभियान अंतर्गत ग्रामीण भागात 2014 पासून गावात महिला बचत गट स्थापन करणे त्यांना रोजगारासाठी प्रोत्साहित करणे,बँक कडून कर्ज उपलब्ध करून देणे,विविध योजनांची माहिती देणे,त्यांच्या सातत्याने बैठका घेऊन मार्गदर्शन करणे दर महिन्याला पंचायत समिती येथे अचूक अहवाल सादर करणे इत्यादी अनेक कामे अगदी तुटपुंज्या मासिक 3000 रू.मानधनात समुदाय संसाधन व्यक्ती(ICRP)म्हणून काम करत आहेत परंतु त्यांचे मागील 18 महिन्या पासून चे मानधन देण्यात आले नाही,तेव्हा त्यांनी कुटुंब चालवायचं कसा हा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला आहे.मानधन मिळावे म्हणून अनेक निवेदन देऊनही शासन व प्रशासन त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे हे अत्यंत गंभीर बाब आहे.त्यांच्या समस्यांची दखल घेत आय टक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांनी व्याहाड येथे मंगळवारी मेळावा आयोजित करून त्यांचा थकीत मानधन व ईतर मागण्या सोडविण्यासाठी 24 सप्टेंबर 2021 रोजी कामबंद आंदोलन करून जिल्हा परिषद समोर तीव्र निदर्शने करण्या चा इशारा दिला आहे.
सदर आंदोलनात आय.सी.आर.पी.महिला कर्मचारी यांचे एप्रिल 2019 पासूनचे थकीत मानधन त्वरित देण्यात यावे.सर्वांना देण्यात येणारे मासिक तीन हजार रुपये मानधन काटछाट न करता दर महिन्याला ICRP महिला कर्मचारी यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा करावे.किमान 21000 रू.वेतन देण्यात यावे.ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कायम स्वरुपी राबविण्याचे जाहीर करावे.ICRP यांना अँड्रॉइड फोन देऊन त्यांचा रिचार्ज खर्च प्रति महिना 500 रू.देण्यात यावा.फिरता निधीचा (खेळता भांडवल)प्रस्ताव 2017 पासून प्रलंबित आहे त्याला त्वरित मंजुरी द्यावी.शुष्म गुंतवणूक निधी(CIF) ग्राम संघाला उपलब्ध करून देण्यात यावी.आय.सी.आर.पी.महीला कर्मचारी यांना शाशना द्वारे वर्षातून दोन ड्रेसकोड व ओळख पत्र देण्यात यावे.त्यांना विमा संरक्षण देण्यात यावा.त्यांना मासिक मीटिंग चा 500 रू.भत्ता देण्यात यावा.त्यांना किमान वेतन लागू होई पर्यंत त्यांच्या मानधनात वाढ करून 10000रू.देण्यात यावे.त्यांना तालुका स्तरावरून वैयक्तिक रुजू आदेश देण्यात यावे.यासह आदी मागण्या आंदोलनात करण्यात येणार आहेत.तेव्हा जिल्हाभरातील सर्व
.ICRP महिला कर्मचाऱ्यानी आयोजित आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ.विनोद झोडगे जिल्हा सचिव कॉ.राखी म्यानावार,सावली तालुका अधक्ष कॉ वनिता पांचलवार,कुसुम टोंगे,निता मुंगाटे, प्रिया भांडेकर प्रतिभा सातपुते यांनी केले आहे.
यावेळी सावली तालुक्यातील सर्व महिला कर्मचारी उपस्थित होत्या.