जातीचा प्रमाणपत्र काढण्याचे भव्य कॅम्पचा लाभ घ्या – API रविंद्र भोरे दि.१५ व १६ सप्टेंबर ला उपोस्टे राजाराम खां येथे

109

 

रमेश बामनकर//अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी:- तालुक्यातील पोलीस स्टेशन राजाराम खां.येथे दिनांक १५ व १६ सप्टेंबर रोजी जातीचा प्रमाणपत्र काढण्याचे शिबीर आयोजित केलेले आहेत.
जिल्ह्यातील दुर्गम भागातील बहुतांश नागरिकांकडे अद्याप जातीचा प्रमाणपत्र नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत.त्यामुळे गडचिरोली पोलीस दल व उप पोलीस राजाराम खांदला येथे पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून शिबिर आयोजित केले आहे.
पोलीस स्टेशन राजाराम हद्दीतील नागरिक जातीचा प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसह उपस्थित राहून शिबिराचे लाभ घ्यावा असे आवाहन प्रभारी अधिकारी रविंद्र भोरे, उपोनि विजय कोल्हे यांनी केले आहे.