कोटगुल परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची कोरची तहसील कार्यालयावर धडक(माजी जि प सदस्य सुरेन्द्रसींह चंदेल यांचे नेतृत्व)

152

कुरखेडा/राकेश चव्हान प्र

कोरची तालुक्यातील कोटगुल परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी माजी जिप सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल यांचे नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडक दिली व तहसीलदार यांना स्थानिक समस्यां ची जाणीव करून देत चर्चा करीत निवेदन सादर करण्यात आले या समस्या मध्ये प्रामुख्याने कोड गुल परी परिसरातील शेतकऱ्यांची रोहिणी अद्याप झालेली नाही धानाचे पर्हे वाढत असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे तरी तात्काळ प्रशासनाने दखल घेत तलाठी व कृषी विभागामार्फत पंचनामा करून मदत मिळवून द्यावी परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्यास सहा ते सात दिवस विज येत नाही तरी वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा शासनाकडून मिळणारे राशन दुकानातून रेशन वेळेच्या आत देण्यात यावे सध्या कोविंड19 महामारी मुळे लाकडा ऊन असल्या कारणास्तव मजुरांना कामे उपलब्ध नाहीत तरी मजुरांना कामे रोहयो मार्फतीने उपलब्ध करून द्यावी कोटगुल गावा नजीक तलावा चे खोलीकरण करून छोट्या नवरा द्वारे शेतीला पाणी उपलब्ध करून द्यावे लाकडाऊन काळातील विज बिल सरसकट माफ करण्यात यावे ऑनलाइन द्वारे पिक विमा भरण्याची मुदत वाढ करण्यात यावी परिसरातील बीएसएनएल चे नेटवर्क सुरळीत करण्यात यावे जेणेकरून बँक व इतर ऑनलाईन कामे करण्या स सहकार्य होईल व इतर मागण्यांचा समावेश होता याप्रसंगी माजी ग्रा प सदस्य अशोक गावतुरे ,श्रीराम निंबेकर, माजी सरपंच भरत साय कुंजाम, राहुल आनंद, कुवर लोकेन्द्र शहा सयाम महाराज, नारद फुलारे, सुरेंद्र बेसरा, पवन मडावी ,रामचंद्र झाडे सह शेकडो शेतकरी उपस्थित होते