भूमिगत विद्युत केबलची व लागलेले फिडर पिल्लरची केली पाहणी:सौ जयश्री किशोर मोहूर्ले नगरसेविका

49

 

दख़ल न्यूज़ भारत:शंकर महाकाली
तालुका प्रतिनिधि, बल्लारपुर

बल्लारपुर : बल्लारपुर शहरात आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातुन अनेक विकास कामांच्या माध्यमातुन बल्लारपूर शहराचा चेहरा मोहरा बदललेला आहे. त्याचाच एक भाग महाराणा प्रताप वॉर्ड, दत्तमंदिर ते जयभीम चौक येथे भूमिगत विद्युत केबलचे काम सुरू आहे. न.प.बल्लारपूर नगरसेविका, सौ जयश्री किशोर मोहूर्ले वॉर्डातील व इतर नागरिकांना त्या खोदकामा पासून कुठलाही त्रास होऊ नये म्हणून त्या प्रत्येक्षात पाहणी करून ते काम कितपत आटोपले ते बघत असून संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्याशी संवाद साधतात. आता ते काम शेवटच्या टप्यावर आले असून तिथे फिडर पिल्लर लावण्यात आले आहे.आपल्या कर्त्यव्याची जाणीव ठेवत नगरसेविका सौ.जयश्री किशोर मोहूर्ले व सामाजिक कार्यकर्ता किशोर नानाजी मोहूर्ले यांचे वॉर्डातील नागरीक सर्वत्र कौतुक करीत दिसत असतात. वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदन चंदेल यांच्या मार्गदर्शनात व नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या क्षुष्म नियोजन बद्ध कार्याच्या तत्परतेने वॉर्डातील अनेक कामे पार पड़त आहे.