एक परिवर्तन लहर….. गौरीच्या…. ठिकाणी माता जिजाऊ, सावित्री, रमाईचे यांचे केले जात आहे पूजन बहुजनांना समतेचा व परिवर्तनाचा दिला सामाजिक संदेश

364

 

हर्ष साखरे उपसंपादक

निलंगा:- सामाजिक संदेश देण्यासाठी समाजाला वास्तववादी दिशा देणाऱ्या राजमाता माँ जिजाऊ , सावित्रीबाई फुले व माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमा महालक्ष्मीच्या ठिकाणी स्थापना करून कांबळे परिवाराच्या वतीने सर्व बहुजनांना समतेचा व परिवर्तनाचा सामाजिक संदेश दिला आहे . निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील लोकमान्य विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या रेखा दिपक कांबळे व ग्रामविकास अधिकारी दिपक कांबळे यांनी गौरी पूजनाच्या ठिकाणी राजमाता माँ जिजाऊ , सावित्रीबाई फुले व माता रमाबाई आंबेडकर यांच्या रुपात महालक्ष्मीची स्थापना करून सामाजिक संदेश दिला आहे . सामाजिक परिवर्तना करिता छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिबा फुले , छत्रपती शाहू महाराज , डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात प्रथमच अशा स्वरूपात थोर मातांचा सन्मान महालक्ष्मी म्हणून करण्यात आला असून या आगळ्या वेगळ्या गौराई स्थापनाबद्दल कांबळे परिवाराचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे . यासाठी कांबळे परिवारातील बौध्द उपासक बळीराम कांबळे , चंद्रकला कांबळे , रेखा सूर्यवंशी , दिपक कांबळे , अरूण कांबळे माजी , शरद कांबळे , अनुजा अरूण कांबळे , पूजा शरद कांबळे , दीप्ती कांबळे , दिशा कांबळे यांनी या करिता योगदान दिले.या आगळ्या वेगळ्या गौराई पाहण्यासाठी विद्यार्थी व महिला ग्रामस्थांनी गर्दी केली असून येणाऱ्या प्रत्येकांना वृक्ष व पेन भेट देऊन कांबळे परिवाराने वृक्ष लागवड व शिक्षणाचे महत्त्व या विषयी जनजागृती देखील के ली आहे .