राज्यस्तरीय ऑनलाईन वत्कृत्व स्पर्धत गुडाळची मयुरी कांबळे प्रथम .

188

 

प्रतिनिधी / उदय कांबळे

माध्यमिक विद्यालय नागांव ता . करवीर या प्रशालेतर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाईन वत्कृत्व स्पर्धत गुडाळ ता . राधानगरी येथील कु . मयुरी भिमराव कांबळे हीचा प्रथम क्रमांक आला . मयुरी कांबळे ही सरवडे येथील खोराटे विद्यालयची विद्यार्थीनी असून ती इयत्ता दहावी कक्षेत शिकत आहे .
माध्यमिक विद्यालय नागांव या प्रशालेतर्फ दरवर्षी वक्कृत्व स्पर्धचे आयोजन करण्यात येते . हे वत्कृत्व स्पर्धचे चौदावे वर्ष आहे . सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणू संसर्गाच्या महामारीत ग्रासलेले असल्यामळे सर्वत्र शाळा , कॉलेज , महाविद्यालये बंद आहेत . असे असतानाही चालू वर्षी नागांव माध्यमिक विद्यालयाने वत्कृत्व स्पर्धला खंड न पडू देता ऑनलाईन स्पर्धा आयोजित केली .
या ऑनलाईन स्पर्धत कोल्हापूर जिल्ह्यातील १६ व कर्नाटक राज्यातील सौदलगा १ असे एकूण १७ विद्यार्थी सहभागी झाले होते . या ऑनलाईन स्पर्धसाठी विद्याथ्र्यांकडून ३ ऑगस्ट २०२० पर्यंत दिलेल्या विषयांवर आधारीत ६ मिनिटांचा व्हिडिओ मागविण्यात आले होते .त्यांचे तज्ञ परीक्षकांकडून परीक्षण करण्यात आले . सदर परीक्षण व्हिडिओ प्रोजेक्टरच्या माध्यमातून मोठया पडद्यावर पाहून करण्यात आले. या ऑनलाइन स्पर्धत सर्वोत्कृष्ट भाषण केल्यामळे गुडाळची मयुरी कांबळे प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली .परीक्षक म्हणून अजय पोर्लेकर , बाळासाहेब संकपाळ , अरविंद मगदूम , प्रकाश खोत , डी.एस. पवार , आर .टी. पवार यांनी काम पाहिले .
मयुरीचे खोराटे विद्यालयामार्फत अभिनंदन करण्यात आले . तीला संस्थेचे अध्यक्ष ए .बी. रानमाळे , उपाध्यक्ष राजेंद्र पाटील , प्राचार्य एल .डी. चौगले , सचिव विठ्ठलराव खोराटे , पर्यवेक्षक बी .एन. मगदूम , वकृत्व विभाग प्रमुख एस .आर. गुरव यांचे प्रोत्साहन तर आर .एस. नायकवडी यांचे मार्गदर्शन लाभले .