वणी पोलीसांचा रुट मार्च

12

 

वणी : परशुराम पोटे

श्री गणेश उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी वणी पोलिसांच्या वतीने आज दि.१४ सप्टेंबर ला सायंकाळी शहरात रूट मार्च पार पडला.
नवनियुक्त पोलिस निरीक्षक शाम सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली पोलिस स्थानकापासून शहरातील शिवाजी महाराज चौक, खाती चौक, शाम टॉकीज चौक, गाडगे बाबा चौक,काठेड चौक ,सर्योदय चौक,टागौर चौक,आंबेडकर चौक व टिळक चौक रोड या प्रमुख मार्गावरुन सहाय्यक पोलिस निरीक्षक माया चाटसे,आनंदराव पिंगळे,पोउनी/ शिवाजी टिपुर्ने, वाहतुक शाखेचे सापोनि/ मुकुंद कवाडे यांसह पोलिस कर्मचारी व होमगार्ड यांचा एकत्रित रूट मार्च पार पडला.