कन्हान येथे रक्तदान शिबीर थाटात संपन्न  तुकाराम नगर गणेशोत्सव मंडळ द्वारे ३० रक्तदात्यांनी केले रक्तदान.

10

 

कन्हान : – नगरपरिषद अंतर्गत तुकाराम नगर परिस रात तुकाराम नगर गणेशोत्सव मंडळ द्वारे रक्तदान शिबी राचे आयोजन करून या शिबीरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबीर थाटात संपन्न करण्यात आले.
रविवार (दि.१२) सप्टेंबर ला तुकाराम नगर गणेशोत्सव मंडळ द्वारे गणेशोत्सवा निमित्य भव्य रक्तदान शिबीरांचे तुकाराम नगर परिसरात आयो जन करण्यात आले असुन या रक्तदान शिबीरात कामठी येथील लाइफ लाइन रक्त पेढी च्या प्रिती बांबल, संजय कांबळे, सुनिल मानापुरे, पायल सागर, विशाल घोडेश्वार आदीच्या सहकार्याने ३० युवक रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबीर थाटात संपन्नन करण्यात आले. शिबीराच्या यशस्विते करिता कन्हान-पिपरी नगरपरिषदेचे नगरसेवक राजेंद्र शेंदरे, अमन घोडेस्वार, राहुल लुहुरे, हर्षल वैद्य, श्रीकांत पाटील, गोपाल हिंगनकर, सुभाष सोनबावने, नितीन ईखार, निलेश लुहुरे, सुनिल रेवतकर, सुभाष हिंगणकर, हितेश साठवणे, रवि नारनवरे, सचिन घोडमारे, धनराज बर्वे, अनिकेत नानोटे, विशाल राऊत, प्रफुल कुहिटे, राहुल कावळे, जतिन गजभिये, भोला इंचुलकर, लोकेश जयपुरकर, आकाश साहारे, ऋृषी देशमुख, प्रतिक कडुकर, आकाश कापसे, अनिकेत राऊत, आकाश वैद्य, हरिष बावनकर, प्रफुल धनेर, अल्केश टेभुर्णे, संदीप वैद्य, राहुल लोंढे आदी नागरिक उपस्थित राहुन सहकार्य केले.